ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरोसा सेल व दामिनी पथकाची कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे “भरोसा सेल” हे सन 2019 मध्ये स्थापन झाले असुन येथे पती पत्नीचे कौटुंबिक वादाबाबत निराकरण केले जाते. सन 2025 मध्ये माहे जानेवारी ते ऑगस्ट मध्ये एकुण 775 तकारी प्राप्त प्राप्त झाल्या असून त्यापैकी 725 तक्रारींचा निपटारा झाला असुन एकुण 304 प्रकरणात महिलांचे संसार वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. भरोसा सेल वर्धा येथे एकुण 08 महिला पोलीस अंमलदार व 2 एन.जी.ओ. चे समुपदेशक तकारीचे निवारण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. तसेच भरोसा सेल येथे जिल्हयातुन लांबुन तकारदार येत असतात. परंतु सध्या पो.स्टे. हिंगणघाट व पो.स्टे. कांरजा येथे एन.जी.ओ. चे संस्थेला मान्यता मिळाल्याने दोन्ही पो.स्टे.ला नवीन समुपदेशन केंद्र सुरु झाले आहेत. त्यामुळे तक्रारदारांचा येण्या जाण्याचा त्रास वाचत आहे. अशाप्रकारे भरोसा सेलकडे येणा-या महिला तक्रारदारांना योग्य कायदेशीर मदत पुरवण्याचे काम भरोसा सेल करत आहे.

तसेच कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत असलेल्या दामिनी पथकामध्ये महिला पुरुष अंमलदार कार्यरत आहेत. दामिनी पथक हे शाळा, महाविद्यालय परीसर बगीचे व निर्जनस्थळी गस्त करते व महिला व मुलींची छेडखानी व इतर अनुचित प्रकार घडु नये याबाबत काळजी घेत असते. तसेच दामिनी पथक प्रमुख सपोनि वाघाडे व स्टाफ हे शाळा, कॉलेज, वस्तीगृहे व ट्युशन क्लासेस येथे जावुन विदयार्थ्यांना गुडटच, बैडटच, पोक्सो कायदा, रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हेगारी व इतर सर्व विषयांबाबत कायदेशीर मार्गदर्शन करुन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. माहे जानेवारी ते ऑगस्ट 2025 दरम्यान एकुण 162 ठिकाणी जनजागृती कार्यकम राबविले आहेत. सध्या वर्धा जिल्हयात सुरु असलेल्या नवरात्रोत्सवा दरम्यान दामिनी पथक हे गस्त करत असून अनुचित प्रकार करणा-यांवर नजर ठेवुन आहोत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली भरोसा सेल व दामिनी पथक प्रमुख सपोनि माधुरी वाघाडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार तारा ताकसांडे, लिला उईके, शुभांगी विघ्ने, अर्चना जाधव, शबाना शेख, रंजना पेटकर, ममता निकोडे, अलका कुंबलवार, दिपाली फरकुंडे, नागेश तिवारी, एनजीओ सुनिता झामरे, मोनिका कठाणे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये