ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नदीचे पात्रातून ट्रॅक्टरमध्ये रेती भरून वायगाव येथे अवैद्य वाहतूक
आरोपी विरुद्ध रेती चोरीचा गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 25/9/2025 रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली की यशोदा नदीचे पात्रातून ट्रॅक्टर मध्ये रेती भरून वायगाव येथे अवैद्य वाहतूक करीत आहे अशा माहितीवरून नाकीबंदी करून ट्रॅक्टर MH 32 P 4684 ला लागून असलेल्या ट्रॉली क्र MH 32 AH 4268 पकडला व पाहणी केली असता,ट्रॅक्टर मध्ये दीड ब्रास ओलसर रेती मिळून आली,चालकाचे नाव प्रवीण अशोकराव इंगळे, रा.वायगाव तसेच मालक नाव प्रशांत दौलतराव वाडगुडे रा.वायगाव असे सांगितल्याने सदर आरोपी विरुद्ध रेती चोरीचा गुन्हा नोंद करून तपासात चालू आहे.
सदरची कारयवाई ठाणेदार देवळी श्री.अमोल मंडाळकर, पोलीस अंमलदार मनोज नप्ते यांनी केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल अलवडकर करीत आहे.