मानधन वाढ करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ग्राम रोजगार सेवक संघटनेने 10 हजार रुपये मानधन देण्यात यावे यासाठी 24 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ग्रामरोजगार सेवक ग्राम पंचायत मध्ये काम करीत आहेत,3 ऑक्टोबर 24 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन निर्णय जाहीर करून 10 हजार रुपये मानधन देण्याबाबत जाहीर केले होते.
मात्र अद्याप पावतो मानधन मिळाले नसल्याने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनाचे अध्यक्ष विठ्ठल वाघ, सचिव सुनील कोल्हे, गजानन नांदवे , संतोष पवार, लिंबाजी शेरे, राजू बोबडे, सुखदेव भालेराव, संतोष खार्डे , गजानन कंकाळ, देवानंद साळवे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.