घुग्घुस नगरपरिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपुर : केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA), भारत सरकार यांच्या स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवड्याच्या माध्यमातून “स्वच्छता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता) ही मोहीम देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.
याच अनुषंगाने आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, घुग्घुसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पडगेलवार यांच्या निर्दशनाखाली सफाई मित्र शिबिर अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात शहरातील सफाई मित्रांसह नगरपरिषदेचे कर्मचारी सहभागी झाले. शिबिरात विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या व स्वच्छतेचे आरोग्यावर होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे सफाई मित्रांच्या आरोग्य संरक्षणासह समाजात स्वच्छतेबद्दल सकारात्मक संदेश पसरविण्यात आला.