ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जीर्ण केंद्रीय विद्यालयाची दुरुस्ती करा; खासदार धानोरकर यांचे आदेश

पालकांच्या तक्रारीनंतर खासदार ॲक्शन मोडवर ; अधिकाऱ्यांशी साधला संपर्क

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : भद्रावती येथील केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी (चांदा)ची जीर्ण झालेली इमारत विद्यार्थ्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इमारतीची दुरुस्ती करण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकांनी दिलेल्या निवेदनानंतर खासदार धानोरकर यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे.

आज वरोरा येथील जनसंपर्क कार्यालय येथे विद्यार्थ्यांच्या पाल्यांची खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेतली. त्याची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावेळी जयश्री नितीन डोंगरे, भावना वाढई, नाजूका नंदेकर, प्रिया निमसरकार, मिनाक्षी डेकाटे, सारिका कोठे, विद्या नरंजे, सविता नेरुलकर उपस्थित होते.

खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये आणि त्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. लवकरच यावर ठोस कार्यवाही केली जाईल आणि पालकांनाही याबाबतची माहिती दिली जाईल.”

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये