लहान मुलांना स्क्रीन पासुन दुर ठेवा : जिशान अन्सारी
युरोलीटल स्कूलची पालकत्व कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मानसीक व शारिरीक विकासासाठी लहान मुलांना स्क्रीन पासून दुर ठेवण्याचे आवाहन माजी राष्ट्रीय करीअर सेवा,कामगार व रोजगार मंत्रालय यांनी केले.
युरोलीटल स्कूल च्या वतीने हाटेल जमघट येथे पालकत्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य वक्ते म्हणुन जिशान अन्सारी, किशोर हेमके,अभी हेमके,अमीत पवार,संगीता खोब्रागडे, प्रमोद नागोसे आदी मान्यवर ऊपस्थीत होते. कार्यशाळेत पालकांना लहान मुलांना स्क्रीन पासुन दुर ठेवण्याचे महत्व, मानसीक आणी शारीरिक विकासासाठी संतुलीत दिनचर्या, तसेच मुलांच्या लहान वयात सकारात्मक सवयी स्विकार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाद्वारे पालकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावांविषयी जागरुकता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गायत्री साहु यांनी केले.सदर कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.