ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बाल चित्रकला स्पर्धेत हर्षल कुरेकार जिल्ह्यात प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर कडून घेण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धेमध्ये,गट क्रमांक चार मधून जगन्नाथ बाबा विद्यालय वायगाव, चा वर्ग 10 वी चा विद्यार्थी हर्षल संजय कुरेकार याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने स्वच्छ भारत या विषयांतर्गत चित्र रेखाटले होते. शिक्षण विभागातर्फे त्याला रोख रकमेत पुरस्कार मिळणार आहे.
शाळेचे मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षक यांच्याकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले. वर्गशिक्षक मंगेश बोढlले सर यांनी त्याला शालेय उपयोगी वस्तू भेट देऊन त्याचे अभिनंदन केले असून सर्वत्र अभिनंदन याचा वर्षा होत आहे.