ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील डॉ. आकाश अनिरुद्ध आवळे यांना आयुष महासन्मान पुरस्कार 2025 प्रदान

चांदा ब्लास्ट

 घुग्घुस (जि. चंद्रपूर) : येथील सुप्रसिद्ध कायरोप्रॅक्टर डॉ. आकाश अनिरुद्ध आवळे यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे दिला जाणारा “आयुष महासन्मान पुरस्कार 2025” मोठ्या दिमाखात प्रदान करण्यात आला. मुंबईतील तारांकित हॉटेलमध्ये (14 सप्टेंबर, रविवार) पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात भारतभरातील शेकडो आयुष डॉक्टर व थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात सिनेसितारा श्रेया बुगडे, चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेता महाले, तसेच युनायटेड नेशन चाईल्ड & वुमेन सल्लागार डॉ. मंगला कोहली, एम.एस.एम.ई. भारत सरकारचे असिस्टंट डायरेक्टर डॉ. एम. गणेश, डॉ. प्रणव पांड्या (ए.आय.एम.ए. राष्ट्रीय सल्लागार), डॉ. प्रवीण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन डॉ. नितीन राजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, तसेच पदाधिकारी डॉ. दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, डॉ. रवी शिंदे, डॉ. रचित म्हात्रे, डॉ. जनार्धन यादव, डॉ. विनोद ढोबळे, डॉ. राकेश झोपे, डॉ. भूषण नागरे, डॉ. विजय नवल पाटील, डॉ. फुके, डॉ. रामेश्वर शिंदे, डॉ. मेश्राम, प्रवक्ते तुषार वाघूळदे आणि अन्य अनेक पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

डॉ. आकाश आवळे यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात विशेषतः आयुष व कायरोप्रॅक्टिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. विविध स्तरातून डॉ. आकाश आवळे यांचे अभिनंदन व कौतुक होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

डॉ. आकाश आवळे यांनी आपल्या कार्यातून स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली असून, हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती मानला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये