ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु व पान मसाल्याची बाहेर राज्यातून वाहतूक करणाऱ्या वाहनासहित १० लाख २४ हजारावर मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई _ चार आरोपी ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि. 20/09/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक पो.स्टे. समुद्रपूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीर कडून गोपनीय माहिती प्राप्त झाली की एका पांढ-या रंगाची तवेरा क्र. MH-15/DC -8780 चारचाकी गाडी ने शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधित तंबाखु व पान मसाल्याची वाहतूक करीत नागपूर कडून वर्धाकडे येत आहे अशा माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक व अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन म.राज्य वर्धा यांचेसह दोन पंचासमक्ष सापळा रचुन नागपूर ते जाम हायवेवरील शेडगाव पाटी चौकातील सर्व्हिस रोडवर नाकाबंदी करीत असतांना माहिती प्रमाणे तवेरा चारचाकी गाडी येतांना दिसल्याने तिला हाथाचा इशारा करून थांबवून चारचाकी गाडी ची पंचासमक्ष पाहणी केली असता गाडी मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला सुंगधीत तंबाखु व पान मसाला साठा व इसम

1) विनायक रामजी मंगरूळकर वय 45 वर्ष, , रा. राम मंदिर जवळ मांडगाव, तह. समुद्रपुर, जि. वर्धा

2) यादव लक्ष्मणराव वानवडे वय 32 वर्ष राहणार पोलीस स्टेशन मागे गिरड तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा

3) पवन दिलीप काटोके वय 23 वर्ष राहणार आठवडी बाजार माणगाव तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा

4) अरुण चंद्रभानजी सदावर्ते वय 31 वर्ष राहणार आठवडी बाजार मांडगाव तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा.,  हे मिळून आल्याने चारही आरोपितांच्या ताब्यातुन शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या कंपनीचा सुंगधीत तंबाखु व पान मसाला, चार अँड्रॉइड मोबाईल किंमत 40,000/-रुपये व प्रतिबंधीत साठा वाहतुकीकरीता वापरलेली एक पांढ-या रंगाची तवेरा क्र. MH-15/DC -8780 कि. 7,50,000 रू असा जु.कि. 10,24,105/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधीत साठ्याचे सेवन हे मानवी जिवीतास धोक्याचे असल्याबाबत, आरोपीतांना जाणीव असुन, सुध्दा त्यांनी स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता प्रतिबंधीत तंबाखु व पान मसाला ची बाहेर राज्यातुन वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने चारही आरोपीतां विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे अप. क्र. 786/2025 कलम 123, 223, 274, 275, 3(5) भा.न्या.सं. सहकलम 3(1)(zz)(iii), 3(1)(z)(v) 26(1), 26(2)(i),26(2)(iv) 27(3)(d)(e), 59, 26(2)(iv) 30(2)(a) अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन समुद्रपूर करत आहे.

 सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे पो.उपनि. प्रकाश लसुंते, स.फौ. मनोज धात्रक, शेखर डोंगरे, पो.हवा. महादेव सानप, पवन पन्नासे, विकास मुंडे, गोविंद मुंडे, पो.अ. सुगम चौधरी, विनोद कापसे, शुभम राऊत , सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व पी. व्ही. मानवतकर, अन्न सुरक्षा अधिकारी, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये