बालाजी महाराज यात्रा महोत्सवादरम्यान प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही… आ.मनोज कायंदे.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रति तिरुपती म्हणून गणल्या जाणाऱ्या तसेच साडेतीनशे वर्षाची पुरातन परंपरा असणाऱ्या श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवा दरम्यान भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा पाढा आज झालेल्या बैठकीत पाढाच वाचला याला प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे धोरण, काम करण्याची प्रणाली कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर महोत्सवा दरम्यान आलेल्या श्री बालाजी भक्तांना भेडसावणाऱ्या समस्या स्थानिक प्रशासनाने प्राधान्य क्रमाने सोडवाव्या त्यामध्ये कसलाही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही अशा प्रकारच्या सूचना आज झालेल्या यात्रा समितीच्या सभेत आमदार मनोज कायंदे उपस्थित सर्व विभागाच्या विभाग प्रमुख यांना दिल्या आणि समस्याचे निराकरण तात्काळ करावे अशा प्रकारचे आदेश दिले. पश्चिम विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र सह भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त श्री बालाजी संस्थान तसेच प्रशासनाच्या वतीने यात्रा समितीचे आयोजन स्थानिक नगरपालिकेच्या सभागृहात दिनांक 20 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते, सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोज कायंदे उपस्थित होते. सालाबादप्रमाणे बालाजी महाराज यात्रा समितीची सभा संपन्न होत असते. त्यामध्ये स्थानिक बालाजी भक्त भेडसावणाऱ्या समस्या मांडत असतात परंतु समस्या मांडूनही काहीही फायदा होत नाही. दरवर्षीप्रमाणे प्रोसिडिंग तयार करून औपचारिकता पूर्ण केली जाते.
परंतु यावर्षी असे होणार नाही बालाजी भक्तांच्या प्रत्येक समस्याचे निराकारण प्रशासनाने करावे अशा प्रकारचे निर्देश आमदार मनोज कायंदे यांनी प्रशासनाला दिले. यात्रा महोत्सवा दरम्यान महाराष्ट्र राज्याचा इतर राज्यातून भाविकासह विविध प्रकारचे व्यापारी किमान दोन महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी आपले दुकाने थाटतात. त्यांना संस्था तसेच प्रशासन यांच्याकडून विनामूल्य जागा देण्यात येते. तीन ते चार दशकापासून जागावाटप समितीमध्ये कायमस्वरूपी तेच सदस्य असल्याने बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्याकडून सदरील जागावाटप समितीचे सदस्य आर्थिक व्यवहार करून जागा देतात यावर तीव्र आक्षेप उपस्थित करत बालाजी भक्तांनी केल्यानंतर या समित्या संदर्भात प्रशासनाने निर्णय घ्यावा यासंदर्भात उपविभागीय अधिकारी खडसे यांनी समित्या संदर्भात पुनर्गठन करण्यात येईल असे सुचविले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने या ठिकाणी कंट्रोल रूम ची व्यवस्था करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून दूरध्वनी नंबर द्यावा तसेच यात्रेमध्ये मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे.
यात्रेदरम्यान मांसाहार आणि उघड्यावरील मास विक्री बंद करावी, आवडतं धंदे जुगार व्यवसाय पत्ता इतर प्रकारचे अवैध धंदे बंद करावे, यात्रेच्या जागेवरील अतिक्रमण काढावे, यात्रेतील व्यापाऱ्यांना सिलेंडर पुरवठा करण्यात यावा, यात्रेमध्ये असलेली चित्रपटांना बंदी करावी, येणाऱ्या भाविकांच्या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था करावी, यात्रा उत्सव दरम्यान रस्त्यावर गर्दी होणार नाही याची पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी, भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवावी, लोड शेडिंग कायमस्वरूपी बंद करावे, बालाजी भक्तांसाठी मुत्रे घर व शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था करावी, बायपास तसेच गावातील रस्त्यावरील खड्डे बुजवावे, यात्रा महोत्सवा दरम्यान एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेस पुरवाव्या, बंद असलेले स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करावे, यात्रेदरम्यान महत्त्वाचा असलेला ललित उत्सव ज्या दिवशी विदेशी दारूचे दुकाने बंद ठेवावी.
लोककला असलेल्या तमाशा मंडळास प्रशासनाने परवानगी द्यावी अशा प्रकारच्या एकूण 30 मुद्द्यावर सभेत चर्चा करण्यात आली सर्व प्रश्न प्रशासनाने तात्काळ सोडवावे अशा प्रकारचे निर्देश आमदार कायंदे यांनी प्रशासनांना दिले, सभेला आमदार मनोज कायंदे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, श्री बालाजी संस्थांचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, वैशाली डोंगरजाळ तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, संदीप शेटे उप अभियंता महावितरण, डॉक्टर प्रवीण वानखडे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, संतोष खांडेभराड माजी नगराध्यक्ष, गोविंदराव झोरे, प्रकाश खांडेभराड, बळीराम मापारी, गजानन काकड, शुभम कायंदे, लक्ष्मण कवळे, दादा जमन व्यवहारे, ब्रिजमोहन मल्लावत, वसंत आप्पा खुळे, पवन झोरे, गोटू धन्नावत, यांच्यासह विविध पक्षाचे तसेच संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडो बालाजी भक्त उपस्थित होते.
सभेचे संचालन पत्रकार सूरज गुप्ता यांनी केले.