जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द येथे अंबुजा फाउंडेशन बेटर कॉटन अंतर्गत मान्यवरांची सदिच्छा भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आसन खुर्द येथे अंबुजा फाउंडेशन बेटर कॉटन अंतर्गत कंट्रोल युनियनचे मान्यवर श्री. डेका सर आणि श्री. उन्मेश सर, मुंबई यांनी दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी शाळेला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली.
या भेटी दरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी आरोग्य, लैंगिक समस्या, बालकामगार, बालमजुरी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा केली. तसेच, विद्यार्थ्यांचे शाळेतील गैरहजर राहण्याचे प्रमाण आणि त्यामागील कारणांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना या विषयांवर जागरूक राहण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी संदेश दिला.
शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून श्री. डेका सर आणि श्री. उन्मेश सर यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. शालेय परिसरातील स्वच्छता आणि सुसज्ज व्यवस्थेचेही त्यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी शाळेच्या स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त करत शाळेच्या प्रशासनाचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या भेटीवेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. घनश्याम पाचभाई, शिक्षक श्री. धंदरे, अंबुजा फाउंडेशनचे श्री. शेंडे सर आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी मिळून या भेटीला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून, शाळेतील शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना आणखी बळ मिळाले आहे.