ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जनावर ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नागपूर – चंद्रपूर महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जनावर जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दि. १९ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली.
नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अनेक मोकाट जनावरे महामार्गावरील रस्त्यावर बसलेली असतात. दि.१९ सप्टेंबरच्या पहाटे एका अज्ञात वाहनाने रस्त्यावर बसलेल्या या मोकाट जनावरांना धडक दिली. त्यात दोन जनावर जागीच ठार झाले.
ही घटना भद्रावती हद्दीतील नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील श्रीराम नगरच्या हिरो होंडा शोरूम जर घडली. मोकाट जनावरांमुळे एखाद्या वेळेस निष्पाप व्यक्तीचा नाहक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.