ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुन्ह्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल आरोपीला कारावासाची शिक्षा

सोबत दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथे अप. क्र. 142/2022 कलम 376,342,323,506 भा.दं.वी. सहकलम 6 पोक्सो चा गुन्हा दाखल असुन तपासात असतांना सदर गुन्ह्याचा तपास मपोउपनी/अनुराधा फुकट यांनी उत्कृष्टरित्या करून दोषारोप पत्र कोर्टात दाखल केले. सदरची केस विद्यमान मा. श्री. मेनजोगे सा. जिल्हा व सत्र न्यायाधिश 3 वर्धा यांचे टेबलवर साक्षपुराव्यावर असतांना श्री. अनुराग जैन, मा. पोलीस अधीक्षक, सा. वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक सा. वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर, मा उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांचे दिशानिर्देशाप्रमाणे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी वेळोवेळी सदर गुन्‌ह्यात फॉलोअप घेवुन कोर्ट पैरवी अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले. पैरवी अंमलदार यांनी नियमतिपणे केसचा पाठपुरावा केला. सदर गुन्ह्यात आरोपी विरूध्द भरपुर पुरावे मिळुन आल्याने मा. श्री. मेनजोगे सा. जिल्हा व सत्र न्यायाधिश 3 वर्धा यांनी दिनांक 16/09/2025 रोजी सदर गुन्ह्यात फायनल जजमेंट देवुन आरोपी सुशील गुलाबराव सरदार, वय 45 वर्षे, रा. मास्टर कॉलनी सावंगी (मेघे), वर्धा यांस कलम 376 भा.दं.वी. मध्ये 20 वर्षे सश्रम कारावास व 2000 रू. दंड व दंड न भरल्यास 3 महीने सश्रम कारावास अशी शिक्षा देवुन जिल्हा कारागृह वर्धा येथे रवाना केले.

तसेच पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथे अप. क्र. 224/2022 कलम 302,324,506 भा.दं.वी. चा गुन्हा दाखल असुन तपासात असतांना सदर गुन्ह्याचा तपास तपासी अधीकारी सपोनी / मल्हारी टाळीकोटे यांनी उत्कृष्टरित्या करून दोषारोप पत्र कोर्टात दाखल केले. सदरची केस विद्यमान मा. श्री. एस.ए.एस.एम. अली सा. जिल्हा व सत्र न्यायाधिश वर्धा यांचे टेबलवर साक्षपुराव्यावर असतांना श्री. अनुराग जैन, मा. पोलीस अधीक्षक, सा. वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक सा. वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांचे दिशानिर्देशाप्रमाणे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी वेळोवेळी सदर गुन्ह्यात फॉलोअप घेवुन कोर्ट पैरवी अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले. पैरवी अंमलदार यांनी नियमतिपणे केसचा पाठपुरावा केला. सदर गुन्ह्यात आरोपी विरूध्द भरपुर पुरावे मिळुन आल्याने मा. श्री. एस.ए.एस.एम. अली सा. जिल्हा व सत्र न्यायाधिश वर्धा यांनी दिनांक 17/09/2025 रोजी सदर गुन्ह्यात फायनल जजमेंट देवुन आरोपी इमरान खान जिलानी खान, वय 25 वर्षे, रा. हुदवे नगर चौरस्ता मेहबुबीया कॉलनी नांदेड यांस 1) कलम 302 भा.दं.वी.मध्ये आजीवन कारावास व 5000 रू. दंड व दंड न भरल्यास 6 महीने सश्रम कारावास, 2) कलम 324 भा.दं.वी. मध्ये 01 वर्ष सश्रम कारावास व 1000 रू. दंड व दंड न भरल्यास 3 महीने सश्रम कारावास अशी शिक्षा देवुन जिल्हा कारागृह वर्धा येथे रवाना केले व तक्रारदारास न्याय मिळाल्याने पोलीसांची प्रतीमा उंचावली.

सदर प्रकरणात श्री. अनुराग जैन, मा. पोलीस अधीक्षक, सा. वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक सा. वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर, मा उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे) चे ठाणेदार, श्री. पंकज वाघोडे, मपोहवा / 1327 अश्विीनी वानखेडे यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये