शास. औ. प्र.संस्थेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा अभियानाची सुरुवात
सार्वजनिक स्वच्छतेमुळे गावात निरोगी वातावरण निर्मिती - वैभव बोनगीरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने शासनाच्या सुचनेनुसार दि. १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे.
चंद्रपूर येथील ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने देवाडा गावात प्राचार्य वैभव बोनगीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो स्वयंसेवकांनी रस्ते, ग्राम पंचायत परिसर, शाळा परिसर सामुहिकपणे स्वच्छ केला. पंधरवडा अभियान उद्घाटन समारंभ देवाडा ग्राम पंचायत सभागृहात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य वैभव बोनगीरवार होते. ग्राम पंचायत सदस्या ज्योती मुळे, सदस्य केशवराव उपरे, श्रीकृष्ण पेंदोर तसेच एम.पी. डब्लू. निलेश राऊत, रासेयो कार्यक्रम अधिकारी जयश्री निमसरकार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार, गटनिदेशक जितेंद्र टोंगे यांची उपस्थिती होती.
यावेळी स्वच्छता आणि आरोग्य संबंधाने प्राचार्य वैभव बोनगीरवार यांनी विचार व्यक्त केले. गावातील स्वच्छतेवर दैनंदिन जीवनात भर देण्याची गरज असून त्यामुळे निरोगी वातावरण निर्मिती होत असते, असे ते म्हणाले. अतिथी परिचय अनिता ढेंगेकर यांनी करून दिला तर सूत्रसंचालन पियुष केने यांनी केले.
आभार प्रदर्शन अभय घटे यांनी केले. निदेशक सुतार, वंजारी, गराड, ढाकणे तसेच NSS स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच या कामात गावकऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.