म्हशी सांभाळणाऱ्या दोघांकडून डॉक्टरला मारहाण
डॉक्टर विरोधात सुद्धा मारहाण केल्याची तक्रार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तहसील कार्यालयाजवळ असलेल्या गजानन नगरीच्या प्रवेशद्वार जवळ म्हशीचा कळप येत असताना मोटार सायकल वरील डॉक्टर प्रविण खराडे यांनी म्हशी सांभाळणाऱ्या धनंजय वाघमारे यांना म्हशी धक्का देत आहेत तेव्हा तीला हाकलू शकत नाही का असे म्हटले असता आरोपी धनंजय वाघमारे व त्याचा मामा यांनी डॉ ला काठीने मारून जखमी केले, जिवे मारण्यची धमकी दिली, डॉ च्या आईला सुद्धा लोटपाट करून शिवीगाळ केल्याची घटना 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता घडली. सविस्तर वृत्त असे की
डॉ. खराडे हे त्याचे भावाचे मुलाला मोटार सायकलवर चक्कर मारुन गजानन नगरीतुन येत असतांना गजानन नगरीचे गेट जवळ समोरुन 15 ते 20 म्हशी आल्या तेव्हा डॉ यांनी त्याची मोटार सायकल रोडचे कडेला उभी केली तेव्हा एक म्हैस मुलाकडे आली असता म्हशी ला हकलले व म्हशी सांभाळणारे धनंजय वाघमारे व यांचे मामा नाव माहीत नाही यांना म्हणाले की म्हशी आम्हाला धक्का देत आहे तुम्ही तीला हाकलु शकत नाही का असे समजावुन सांगत असतांना आरोपी यांनी त्यांचे हातातील
काठीने डॉ ला मारून जखमी केले व शिवीगाळ करुन जिवे मारण्याचे धमकी दिली. डॉ ची आई यांना सुध्दा लोटपाट करून शिवीगाळ केली, घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी 2 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे डॉ. प्रवीण खराडे यांच्या विरोधात मनोहर गोगडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून डॉ.ने मला व धनंजय वाघमारे यांनी मारहाण करून तुमच्या गाई म्हशी ला औषध टाकून मारून टाकील, पोलिसांनी डॉ. विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नायबराव मोगल करीत आहे.