सर्व धर्मीय वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : स्मित बहुउद्देशीय युवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आम्रपाली वॉर्ड, मदर टेरेसा प्री प्रायमरी स्कूल घुग्घुस येथे दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सर्व धर्मीय वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्याचे आयोजन नागसेन भगत व अक्षय कोवले यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले. नव्या पिढीला विवाहासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. घुग्घुसमध्ये पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या मेळाव्यात तब्बल 70 युवक-युवतींनी सहभाग घेतला. विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या समाजबांधवांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला.
वधू-वर तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. समाजातील गरजू उपवधू-वरांना मदत करून सामाजिक बांधिलकी दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी मदर टेरेसा स्कूलचा शिक्षकवर्ग, तसेच मेळावा समितीचे भारत साळवे, शुभम बावनकुळे, बबलू मुंडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. प्रविण खोब्रागडे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून आशिष माशिरकर (युवा नेते), राजू रेड्डी (काँग्रेस शहर अध्यक्ष), श्रीनिवास गोसकुला (राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष), संजय तिवारी (भाजपा शहर अध्यक्ष) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच अनवर सय्यद, गंगाधर गायकवाड, एस.एम. पाटील, बाळू चिकनकर, बंटी घोरपडे, अमित बोरकर, गणेश उईके, श्याम कुम्मरवार, हेमराज बावने, चेतन बोबडे, दीपक पेंदोर, योगीराज पाझारे, मारोती जुमनाके, यास्मिन सय्यद, रिता कोवले, मया सांड्रावार, सुरेखा टिपले, उर्मिला लिहीतकर, दिक्षा भगत तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी केल्याबद्दल आयोजक व सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.