Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथे “पारितोषिक वितरण सोहळा” संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत नुकताच “पारितोषिक वितरण सोहळा” आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळ्यात वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि स्पंदन 2025 या सांस्कृतिक महोत्सवात विजेते आणि उपविजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले. यावेळी प्रमोद बानबले, ठानेदार, ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन हे प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य प्रा. राजेंद्र राचलवार उपस्थित होते.

यावेळी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद बानबले यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त, आत्मविश्वास आणि कष्ट या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा मौलिक सल्ला दिला. प्रा. राचलवार यांनी विद्यार्थ्यांनी आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. क्रीडा स्पर्धा या केवळ जिंकण्यासाठी न खेळता त्या आयुष्यातील अपयशाला कसे सामोरे जायचे हेदेखील शिकवता असे प्रतिपादन केले. यावेळी मंचावर डॉ. आशीष बहेंडवार, जिमखाना उपाध्यक्ष तसेच प्रा. जयंत बोरकर, समन्वयक, स्पंदन 2025 उपस्थित होते. यावेळी ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे ,अध्यक्ष विजय रामटेके आणि लोकमत दैनिकाचे पत्रकार प्रा. रवी रणदिवे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक सचिव रश्मी दुर्योधन तर आभार प्रदर्शन स्नेहसंमेलन सचिव नेहा घुबडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी हर्षदा उत्तलवार, साक्षी तोंडरे, सायूरी मूर्तेली आणि गौरी ठेंगरी यांनी केले. यावेळी जिमखाना मंडळातील पदाधिकारी विद्यार्थी जिमखाना सचिव साहिल वाघधरे, क्रीडा सचिव मुले आदेश भोयर, क्रीडा सचिव मुली मनस्वी शेटीये, वार्षिकांक सचिव साक्षी खापणे, वार्षिकांक सहसचिव साहिल पुठ्ठावार आणि वार्षिकांक सहसचिव मंथनी कोल्हे उपस्थित होते. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये