ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री महर्षी विद्या मंदिर येथे मास्टर शेफ प्रतियोगितेचे आयोजन

चांदा ब्लास्ट

दि. १९/०१/२०२४ रोजी श्री महर्षी विद्या मंदिर , दाताळा येथे प्री -प्रायमरी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मास्टर शेफ प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिमुकल्यांनी व त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.आपल्यातील पाक कलेतील कौशल्य त्यांनी येथे मोठ्या उत्साहाने प्रस्तुत केले. यामध्ये पालकांनी विविध पदार्थ बनविले होते. पौष्टिक अश्या पदार्थापासून विविध पदार्थ बनवण्यात आले होते. जसे, फ्रुट सॅलड, बिस्कीट सँडविच, पानाचे लाडू, गुलाबजामून व विविध प्रकारचे गोड पदार्थ बनवण्यात आले होते.

यामध्ये डॉ. मनीष घुगुल आणि श्रीमती. राखी बोराडे यांनी परीक्षकांचे कार्य केले. सिविल लाइन येथील प्री -प्रायमरी शाळेच्या प्रमुख श्रीमती. नम्रता नागरेचा यांनी परीक्षकाचे काम केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती. सुप्रिया भट, श्रीमती. रिंकू सुराणा उपस्थित होते.

विजयी स्पर्धकांमध्ये नर्सरी मधून प्रथम क्रमांकावर उर्वी वांढरे, द्वितीय क्रमांक याषिता मते तर तिसऱ्या क्रमांकावर देवांशी तेलमाशे आले होते.

केजी वन मधून प्रथम क्रमांकावर श्रेया देशपांडे, द्वितीय क्रमांकावर सिद्धेश पराते तर तृतीय क्रमांकावर पारस पटले होते.

केजी टु मधुन प्रथम क्रमांकावर राम चहारे, द्वितीय क्रमांकावर पार्थ लोखंडे तर तृतीय क्रमांकावर पृथा माडूरवार होते.

प्रोत्साहन पर बक्षीस मिहित जुमडे व अवनी निमकर यांना देण्यात आले होते. श्री महर्षी विद्या मंदिर सिविल लाइन येथील प्री -प्रायमरी च्या प्रभारी श्रीमती. नम्रता नागरेचा व श्री महर्षी विद्या मंदिर, दाताळा येथील प्री -प्रायमरी विभागाच्या कोऑर्डिनटोर श्रीमती. अनुराधा भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

कार्यक्रमाला गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक, सचिव श्री. दत्तात्रय कंचर्लावार तसेच इतर सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. श्रीलक्ष्मी मूर्ती, उपमुख्याध्यापिका निशा मेहता उपस्थित होते. सर्वानी विजयी स्पर्धकांचे पालकांचे अभिनंदन केले.

तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षकगण, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये