श्री माता महाकाली महोत्सवाचे मंडप पूजन
२७ सप्टेंबरपासून होणार भक्तिभावात महोत्सवाची सुरुवात

चांदा ब्लास्ट
दि. २७ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त आज श्री माता महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मंडप पूजन करण्यात आले. माता महाकाली पटांगणात आयोजित या महोत्सवात पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मंडप पूजन कार्यक्रमाला श्री माता महाकाली महोत्सवाचे उपाध्यक्ष सुनील महाकाले, सचिव अजय जैस्वाल, सहसचिव बलराम डोडानी, विश्वस्त मिलिंद गंपावार, संजय बुरघाटे, अजय वैरागडे, राजू शास्त्रकार, भारतीय जनता पार्टी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथ ठाकूर, तुषार सोम, सविता दंडारे, प्रदीप किरमे, अरुण तिखे, वंदना तिखे, दुर्गा वैरागडे, विमल काटकर, नीलिमा वणकर, चंद्रशेखर देशमुख, दिगंबर चिमुरकर, कल्पना शिंदे, ताहीर हुसैन, प्रवीण कुलटे आदीची उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रात श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून ३० सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा व पालखी काढण्यात येणार आहे. महोत्सवाची तयारी उत्साहात सुरू असून आज मंदिर परिसरात विधीवतरीत्या मंडप पूजन करण्यात आले.
शारदीय नवरात्राच्या पावन पर्वावर आयोजित श्री माता महाकाली महोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम ठरणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. दरवर्षी प्रशासनाकडून महोत्सवाला मोठे सहकार्य मिळत असते. यंदाही महोत्सव समितीसोबत समन्वय साधून उत्तम नियोजन करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.
यावेळी प्रभारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अति. आयुक्त चंदन पाटील, अति. पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, शहर अभियंता रवींद्र हजारे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेळके, उपअभियंता (यांत्रिकी) रवींद्र कळंबे, उपअभियंता (विद्युत विभाग) प्रगती भुरे, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) आशिष भारती, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) वैष्णवी रिठे, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) अतुल भसारकर आदी अधिकारी उपस्थित होते.