महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडमी व विद्या मंदिर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहण महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव (महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम, मुख्याध्यापिका किरण कुंडू (महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडमी व विद्या मंदिर), उपमुख्याध्यापक विजय डाहुले, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे व पर्यवेक्षिका माधुरी मस्की, व्यवसाय शिक्षण विभाग प्रमुख आरजू यांचा समावेश होता.
याप्रसंगी सुधीर थिपे, श्री. पांचाळ व श्री. मनोज तोडासे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ. शैलेंद्र देव यांनी अध्यक्षीय भाषण केले.
मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व विषद केले.
१७ सप्टेंबर १९४८ रोजी पोलिस कारवाईद्वारे निजामशाहीच्या जोखडातून मराठवाड्याची मुक्तता झाली. हैदराबाद संस्थानातील मराठवाडा या भागाला स्वातंत्र्य मिळून भारतात विलीन होण्याचा ऐतिहासिक क्षण हा होता. देशभक्तांच्या बलिदानामुळे हा प्रदेश स्वातंत्र्य भारताचा भाग झाला. त्या स्मृतीदिनानिमित्त हा दिवस दरवर्षी “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” म्हणून साजरा केला जातो.
संचालन प्रशांत धाबेकर व आभार प्रदर्शन अमोल शेळके यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.