जीबगाव ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम योजना पुरस्काराने सन्मानित
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ; जिल्हास्तरीय तृतीय पारितोषिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विभागस्तरीय पारितोषिक
स्मार्ट ग्राम योजना राज्यातील सर्वत्र गावात राबविली जात असून ग्रामीण भागातील विकासात महत्वाचे भरीव कामगिरी बजावणाऱ्या व निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या स्तरावर नुकतेच गौरविण्यात आले आहेत.
तसेच आशिष आकनूरवर याना आदर्शग्रामपंचायत अधिकारी म्हणून शाल श्री फळ देऊन गौरविण्यातआलेआहे.यामध्ये सावली तालुक्यातील जीबगाव ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम योजनातर्गत तालुक्यास्तरीय प्रथम पारितोषिक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आलाआहे. तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर तृतीय पारितोषिक व माझी वसुंधरा अभियानांतर्गत विभाग स्तरीय पारितोषिक पटकावून गाव विकासात मोलाचे योगदान दिले असून आशिष आकनूरवर यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून शाल श्री फळ देऊन गौरविण्यात आले आहे.त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत जीबगाव गाव२०२४-२५साठी स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी करून दिली असून जीबगावाचे नाव लौकीक केले आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी झाले होते.या योजनेचा उद्देश गावात शाश्वत विकास साधणे,पर्यावरणाचे संवर्धन करणे,गावांना समृद्ध व संपन्न बनविणे हा उद्देश होता. निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सत्कार व समारंभ कार्यक्रम मोठया उत्साहात जिल्हा स्तरावर नुकताच घेण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाला पुलकित सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर,मीना साळुंखे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प.)चंद्रपूर, किशोर जोरगेवार आमदारचंद्रपूर, देवराव भोंगळे आमदार, अभिजित वंजारी विधानपरिषद सदस्य पदवीधर नागपूर विभाग, सुधाकर अडबाले विधानपरिषद सदस्य शिक्षक नागपूर विभाग, उपस्थित होते.
सावली तालुक्यातील जीबगव ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरुषोत्तम चुदरी सरपंच व आशिष आकनूरवर आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण करूनसत्कार मंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आहे. निधी जाहीर करण्यातआलाआहे. जीबगाव ग्रामपंचायतला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळण्याने सर्वत्र कौतुककेलेजात आहे.