ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज येथे वर्कशॉप विभागतर्फ विश्वकर्मा जयंती साजरी

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज येथे वर्कशॉप विभागतर्फ विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.एस.आंबटकर,पियूष आंबटकर,अंकिता पि.आंबटकर,प्राचार्य जमीर शेख, उपप्राचार्य अनिल खुजे उपस्थित होते.

    सर्व प्रथम भगवान विश्वकर्मा च्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्कशॉप विभागाचे प्रमुख यांनी सर्व औजारांची तसेच उपकरणाची पूजा केली,मान्यवर भगवान विश्वकर्मा याचा इतिहास सांगत भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता.ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.

         त्यांनी ‘विश्वकर्मा वास्तुशास्त्र’ या ग्रंथाची रचना केली.ब्रह्माच्या इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन औजारे शोधलीत.त्यांना सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान प्राप्त होते. सूर्याचे या शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू शिव व इंद्रासाठी क्रमाने सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला.

       या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्कशॉप विभागाचे प्रमुख प्रा.मनीष हिवरे,यांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे,प्रा.अशोक यादव,प्रमोद खोब्रागडे,नितीन येरणे,हारून शेख,राकेश ढोक तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये