ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाश्वत स्वच्छते करीता लोकांचा सहभाग महत्त्वाचा

स्वच्छता ही सेवा अभियानाचा गावागावात शुभारंभ

चांदा ब्लास्ट

स्वच्छता दुतांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार

          स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दिनांक १७ सप्टेंबरला शुभारंभ प्रत्येक गावात करण्यात आला. जिल्हास्तरीय शुभारंभ चंद्रपूर तालुक्यातील मोरवा या गावातून करण्यात आला . यावेळी गावात स्वच्छते विषयी सातत्य राखण्याकरिता व शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याकरिता लोकांनी स्वतःहून सहभागी होणे गरजेचे आहे .असे मत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक वूईके यांनी व्यक्त केले.

स्वच्छता ही सेवा अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख उदघाटक चंद्रपूर जिल्हा चे पालकमंत्री ना. अशोक वूईके तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकीत सिह यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामस्थांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली.

मोरवा गावातील स्वच्छता दुत शेषराव गुरुनुले,धनरज घोरुडे यांचा पालकमंत्री यांच्या शूभ हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणाचे गिरीष धायगुडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन नूतन सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मीना साळूंके, प्रकल्प संचालक जलजिवन मिशन मच्छिंद्रनाथ धस, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, गटविकास अधिकारी संगीता भांगरे, गावातील सरपंच, ग्रामसेवक ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, जिल्हास्तरावरील कर्मचारी, चंद्रपूर पंचायत समितीचे कर्मचारी गावातील ग्रामस्थ ,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा पंधरवाडाला १७ सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत स्वच्छता ही सेवा अंतर्गत असेच विविध उपक्रम राबवून गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याकरिता जनजागृती करून, लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील सर्व गावात आज मोठ्या प्रमाणात स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक गावात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होऊन, गाव स्वच्छ राखण्याकरिता पुढे आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये