पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत आरोग्य शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न
अनेकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, संजीवनी ममता हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तसेच न्यू. इरा क्लिंनटेक सोल्युशन कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे जन्मदिवसाचे औचित्य साधत सुरू झालेल्या भव्य आरोग्य शिबिराचा समारोप आज दिनांक १७ रोज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवशी शहरातील घोडमारे लॉन इथे संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर एम आय डी सी चे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा विशेष अतिथी धारनिधर शर्मा, विशालजी सरीया, तपनजी महारीसी तसेच गिरीश पद्मावार, व भाजपाचे माजी नगरसेवक प्रशांत डाखरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन न्यू इरा कंपनीचे सचिन धात्रक तर आभार प्रदर्शन सौरभ डफ यांनी केले.
याचा आढावा घेतला असता याचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला असून यापुढेही आपली सामाजिक दायित्वाची भूमिका कायम राहील असे मान्यवरांनी स्पष्ट केले.
तद्वतच कंपनी निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्याही हिताचा विचार करेल असे आवर्जून सांगितले.