महानिर्मितीच्या चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राला ‘ग्रीन एक्सलन्स अवॉर्ड २०२५
पर्यावरण संवर्धनात उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव.

चांदा ब्लास्ट
दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी रामदेवबाबा युनिव्हर्सिटी, नागपूर येथे कालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, नागपूर चॅप्टरतर्फे आयोजित ३६ वी सीसीक्यूसी २०२५ स्पर्धा पार पडली. ‘आत्मनिर्भर विकसित भारत या संकत्पनेवर आधारित या स्पर्धेत विविध नामांकित उद्योगांमधील अनेक टीम्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत महानिर्मितीच्या चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील इको गार्डियन्स काईझेन (पर्यावरण विभाग) व अमृतजल कालिटी सर्कल (जलप्रक्रिया विभाग-१) या टीम्सनी सहभाग घेतला.
इको गार्डियन्स काईड्रोन टीमने अप्रतिम कामगिरी करत केस स्टडी सादरीकरणासाठी सुपर गोल्ड अवॉर्ड मिळवला तसेच घोषवाक्य स्पर्धेत सर्जनशील मांडणीकरीता डॉ. अंकुश कुलारकर, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ यांनी तृतीय पारितोषिक आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत ज्ञानातील उत्कृष्टतेबद्दल सौ. सेहत करांडे, उपकार्यकारी रसायनशास्लक्ष यांनीही तृतीय पारितोषिक पटकावले. तसेच अमृतजल क्वालिटी सर्कल टीमने केस स्टडी सादरीकरणासाठी सुपर गोल्ड अवॉर्ड आणि बेस्ट पेज सेटिंग अवॉर्ड जिंकून गौरव मिळविला आहे. या दोन्ही विजयी टीम्स १९ ते २२ डिसेंबर २०२५ दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय NCQC स्पर्धेत चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या पशासोबतच चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्रास पर्यावरणपूरक उपक्रम, शाश्वत पद्धती तसेच सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल “ग्रीन एक्सलन्स अवॉर्ड २०२५० हा पुरस्कार कालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, नागपूर चॅप्टरतर्फे प्रदान करण्यात आला. पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या विविध हरित उपक्रमांचा हा सन्मान असून, वीज निर्मिती प्रकल्पांमधील हरित विकासासाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. या पुरस्कारासाठी चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता (प्रशासन) डॉ भूषण शिदि व अधीक्षक अभियंता श्री महेश राजूरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, हा पुरस्कार चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्रासाठी पुढील कार्यात नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी प्रतिक्रिया चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री. विजय राठोड यांनी व्यक्त केली.