ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगण‌घाट तहसीलतील ग्रामीण येथील विकास विद्यालय,व कनिष्ठ महाविद्यालय पोहणा…

येथे अनुगामी लोकराज्य महाभियान संविधानाची पंचाहत्तरी कार्यक्रम आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाविद्यालयात अनुलोमच्या वतीने ‘संविधाना ची पंचाहत्तरी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनुलोम ही संस्था २०१६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात समाज आणि शासन याच्यातील दुवा म्हणून कार्यरत आहे. शासनाच्या योजना समाजाच्या तळागळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम अनुलोम च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.

संविधानला ७५ वर्षपूर्ती निमित्ते शाळा महाविद्यालयीन विध्यार्थी व विध्यार्थीनी संविधान विषयी माहिती देऊन त्यांच्या मनात संविधान विषयी आदर वाढवा. म्हणून महत्व कळावे व चांगला नागरिक घडावा या उद्देशाने अनुलोम ने संविधान ७५ वर्षे हा कार्यक्रम घेतला कार्यक्रमाचे वक्ता प्राचार्य एम आर साबळे साहेब तसेच उपस्थित अनुलोम संस्थेचे तालुका समन्व्यक महेश वैद्य, प्रियाताई दोडके व अनुलोम मित्र व विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य एम आर साबळे तसेच सिर्सिकर सर,व  कानकाटे, यारवार बाबू,व इतर शिक्षक व शिक्षेकेत्तर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आपल्या संविधानाची पंचाहत्तरी कार्यक्रमाचे माध्यमातून अनुलोम संस्थेची पूर्ण माहिती दिली व आपल्या संविधानाला  प्राचीन संस्कृति चा वारसा लाभला संविधानाची ताकत  सोप्या भाषेत उपस्थित विद्यार्थ्याना उदाहरणाच्या माध्यमातून सांगितले वक्ते प्राचार्य एम आर साबळे  यांनी विद्यार्थ्याना पि.पि.टी.द्वारे प्रेझेटेशन करुन संविधानाची पंचाहत्तरी ची माहिती विषद केली.आभार सिर्सिकर यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये