इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर २०२३-२४ चा उद्घाटन समारंभ संपन्न
इनरव्हीलच्या नूतन अध्यक्षा आणि त्यांच्या कार्यकारिणीचे स्वागत
चांदा ब्लास्ट
इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर २०२३-२४ चा उद्घाटन समारंभ शनिवार दि. ८ जुलै रोजी संपन्न झाला. इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर या महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या अग्रगण्य सामाजिक सेवा संस्थेचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
रोटरी जि. ३०३० DGE श्री. राजेंद्र खुराना आणि जि. सचिव सेवा प्रकल्प वीरेंद्र पत्रीकर एजी रामा गर्ग उपस्थित होते.
गतवर्षीच्या अध्यक्षा ममता दादुरवडे यांनी नूतन अध्यक्षा राखी मनीष बोराडे यांना कॉलर लावून नूतन अध्यक्ष म्हणून सनद सुपूर्द करून राखी बोराडे व त्यांच्या सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व गणपती वंदनाने करण्यात आले. अध्यक्षा राखी बोराडे यांनी सर्वाना आपल्या नवीन कार्यकारिणीची ओळख करून दिली व नवीन सदस्यांचा देखील क्लबमध्ये समावेश करण्यात आला, तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ.पुष्पा पोडे यांना देखील नवीन सदस्य करण्यात आले.
यावेळी क्लबचे सर्व माजी अध्यक्ष, रोटरीचे सन्माननीय सदस्य आणि रोट्रॅक्ट रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते, त्यांनी इनरव्हीलच्या नूतन अध्यक्षा आणि त्यांच्या कार्यकारिणीचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
राखी बोराडे यांनी येत्या वर्षभरात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली व सर्वांचे आभार मानले.