ताज्या घडामोडी

51 शाळकरी मुलांना महावीर इंटरनॅशनलच्या चंद्रपूर शाखेने घेतले दत्तक – संस्थेच्या अनोख्या उपक्रमाचे शिक्षकांनी केले कौतुक

शाळेच्या शुल्कासह इतर सर्व खर्च करणार संस्था - जैन साध्विंच्या हस्ते झाली सुरुवात

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

आपल्या समाजाभिमुख व सेवा कार्यांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या महावीर इंटरनॅशनल ह्या संस्थेच्या चंद्रपूर शाखेने चातुर्मासानिमित्याने अनोखा उपक्रम हाती घेतला असुन संस्थेच्या चंद्रपूर शाखेने शहरातील विविध शाळांना भेटी देऊन शाळांतील गरीब, गरजू व होतकरू मुलांचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये व त्यांच्यातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 51 विद्यार्थ्यांना दत्तक घेतले.

महावीर इंटरनॅशनल ने मागील वर्षभरात जिल्ह्यात दहा विविध ठिकाणी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करून गरजूंना चष्मे वितरित केले त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात सहकार्य केले. उन्हाळयात पाणपोई, पावसाळ्यात ग्रामीण भागातील गरजूंना छत्री वितरण तसेच शासकीय रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या मातांना बेबी किट भेट म्हणून देण्यात संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे.

यंदा नव्याने सुरू केलेल्या ह्या उपक्रमाचा शुभारंभ चातुर्मासानिमित्त शहरात वास्तव्यास असलेल्या जैन साध्विंच्या शुभहस्ते करण्यात आला. शहरातील पटेल हायस्कूल, लोकमान्य टिळक महाविद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, भवानजी भाई हायस्कूल इत्यादी शाळांतील विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असुन ह्या विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शैक्षणिक शुल्क, वह्या पुस्तके, शाळेचे संपूर्ण गणवेश व इतर साहित्य देण्यात आले. महावीर इंटरनॅशनलच्या चंद्रपूर शाखेने अंगिकरलेल्या उपक्रमाचे संबंधित शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी तसेच पालकांनी कौतुक केले आहे.

महावीर इंटरनॅशनल तर्फे राबविण्यात येत असलेल्या ह्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे दिलीप भंडारी, त्रिशूल बंब, जितेंद्र चोरडिया, मनीष खतोड, तुषार डगली, नरेश तालेरा, निर्मल भंडारी, नेहा बैद, अर्चना मुनोत ह्यांचेसह इतर सदस्यांनी सक्रिय योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये