लोखंडी सतुरणे फिर्यादीचे डोक्यावर मारून केले गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
घटना तारीख दि. 13/9/2025 चे ९ वाजताच्या दरम्यान घटना स्थळ बोरगाव मेघे वार्ड 6 वर्धा येथे नमूद फिर्यादी मोहन तीरत सुवाडोर वय 50 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 6 बोरगाव मेघे वर्धा. आपले पत्नी व परिवारासह आपले घरी हजर असतात नमूद आरोपी मुलगा हा बाहेरून घरी आला व आपले वडीलास तुम्ही रोज घरी दारू पिऊन येता असे म्हटले असता फिर्यादी यांचे आरोपी मुलासोबत भांडण झाले असता आरोपी अमोल मोहन सुवाडोर वय 25 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 6 बोरगाव मेघे वर्धा., मुलाने मनात त्याचा राग घेऊन घरात ठेवून असलेल्या लोखंडी सतुरणे फिर्यादीचे डोक्यावर मारून गंभीर जखमी केले पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्याचा तपास वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष टाले यांच्या सपोनी.राम ढगे पोलीस हवालदार सचिन धुर्वे थेमसिंग कोहचडे अमोल तिजारे. करीत आहे.