ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोवर्धन नामदेव टिकले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रह्मपुरी-चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ब्रह्मपुरी पंचायत समिती मधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुगनाळा येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असणारे श्री गोवर्धन टिकले यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले, चंद्रपूरचे आमदार मा. किशोर जोरगेवार, राजुरा आमदार मा.देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मा. पुलकित सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी अतिरिक्त मु.का. अधिकारी घायगुडे साहेब, उपमुख्य कार्यपालन अधिकारी मा.साळुंखे साहेब,शिक्षणाधिकारी मा.अश्विनी केळकर मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजू पातळे, तसेच सर्व पंचायत समिती गटविकास अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सांस्कृतिक व क्रीडा विषयी स्पर्धा, परसबाग निर्मिती ,व्यसनमुक्त शाळा यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन, विविध प्रशिक्षणात मार्गदर्शक, शाळा विकासासाठी सतत झटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ब्रह्मपुरी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी मा.रवींद्र घुबडे, गटशिक्षणाधिकारी मानिक खुणे, विस्तार अधिकारी गायत्री तोराम व विद्या शेळके मॅडम,केंद्रप्रमुख सुरेश बुराडे, शाळेचे मुख्याध्यापक गजानन प्रधान, सहाय्यक शिक्षक प्रभा गणवीर, संगीता वैद्य ,स्वाती लाडेकर ,स्वाती नाकाडे, विषय शिक्षक धनपाल दमके,योगराज बोरकुटे तसेच जुगनाळा येथील सरपंच लक्ष्मीताई सहारे, उपसरपंच गोपाल ठाकरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल तोंडरे,उपाध्यक्ष निर्मला देवतळे, सर्व ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, केंद्रातील सर्व शिक्षकांनी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये