क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट पोलीसांची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई

एकुण 1 लाख 10 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि 10-07-2023 रोजी पोलीस नाईक स्वप्नील जिवने यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की एक इसम काळसर रंगाची डेस्टीनी मोपेड गाडी क्रमांक एम एच 32 ए यू 6877 गाडीने देशी दारुची विनापास परवाना अवैद्धरित्या वाहतुक करुन शास्ञी वार्ड हिंगणघाट कडे येत आहे अश्या माहिती वरून पंच व पोउपनि होमकांत मशाखेञी पोलीस नाईक स्वप्नील जिवने , पो काँ भारत बुटलेकर, मंगेश वाघमारे , राजेन्द्र निवलकर, आशिष नेवारे असे शास्ञी वार्ड हिंगणघाट येथे पोहचुन आरोपी नयन रंगराव दंडवते 27 वर्ष रा- इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट याचेवर प्रो रेड केला असता नमुद आरोपी याचे ताब्यातुन देशी दारूने भरुन असलेल्या प्लास्टीकच्या 90 एम एल च्या एकुण 300 शिश्या प्रति शिशी 100 रू प्रमाणे 30,000/रू व काळसर रंगाची डेस्टीनी मोपेड गाडी क्रमांक एम एच 32 ए यू 6877 कि 80,000/रू असा एकुण 1,10,000/रू चा माल पंचासमक्ष मिळुन आल्याने त्यास सदर माला बाबत विचारणा केली असता त्याने सदर माल हा पसार आरोपी सूरज उर्फ शे-या पिंपळकर रा. दारोडा ह.मू. संत कबीर वार्ड हिंगणघाट याचा असल्याचे सांगीतल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून पो स्टे परत येवुन आरोपीतांविरूध्द अप क्र 810/23 कलम 65(अ),(ई),77(अ), 83 मदाका सहकलम 3 (1),181,130/177 मो वा का अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री नरूल हसन सा.मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा.मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आबुराव सोनवने यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री कैलास पुंडकर याचे निर्देशाप्रमाणे पोउपनि होमकांत मशाखेञी,पोहवा जगदीश चव्हान,पोलीस नाईक स्वप्नील जिवने, पो काँ भारत बुटलेकर, मंगेश वाघमारे, राजेश निवल, आशिष नेवारे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये