ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समितीतर्फे 30 गणेश मंडळाचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समितीतर्फे श्री गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी 30 श्री गणेश मंडळाचा ग्रामदैवत श्री बालाजी महाराजांची लाईटची फोटो प्रतिमा, सन्मानपत्र, शाल श्रीफळ, टोपी,पुष्पहार देऊन श्री गणेश मंडळाचा क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक येथील छत्रपती गणेश मंडळाच्या मंचकावर सन्मान करण्यात आला.

     श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समिती देऊळगाव राजा ही 1993 ला स्थापन झाली या समितीमध्ये शहरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले सन्माननीय व्यक्ति एकत्रित येऊन सदर समितीच्या माध्यमातून श्री गणेश भक्तांना व श्री गणेश मंडळ यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे.

यामध्ये प्रशासनात कार्यरत असलेले विद्यमान अधिकारी व आमदार, माजी आमदार हे मानद सदस्य असतात श्री गणेश उत्सव प्रोत्साहन समिती 2025 तर्फे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले 30 गणेश मंडळ यांनी विविध देखावे व मंडळासमोरसादरीकरण केले या गणेश मंडळाचा ग्रामदैव श्री बालाजी महाराज यांची लाईटची फोटो प्रतिमा, सन्मानपत्र,शाल, टोपी व श्री बालाजी संस्थांचे मानाचे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर व नंदन खेडेकर यांच्याकडून रोख बक्षीस देण्यात आले

     श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समिती 2025 चे अध्यक्ष ब्रीज मोहन मल्लावत यांच्या अध्यक्षतेमधील समितीचे गठन झाले यावेळी येणाऱ्या श्री गणेश मंडळाचे स्वागत समितीतर्फे अध्यक्ष ब्रिजमोहन मलावत उपाध्यक्ष मंगेश तिडके व योगेश खांडेभराड मानद सदस्य माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर,आमदार मनोज कायदे यांचे प्रतिनिधी बंधू सतीश कायंदे नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ, पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी संघटक ॲड घनश्याम बाला, वसंतप्पा खुळे, विनोद जयस्वाल,गोविंदराव झोरे, कैलास धन्नावत,सचिव संचित धनावत,कोषाध्यक्ष सुरज गुप्ता गणेश मंडळ संपर्कप्रमुख पवन बोराटे,अरविंद खांडेभराड, प्रसिद्धी विभाग प्रमुख सर्व पत्रकार संघ मानद सदस्य श्री बालाजी संस्थान राजे विजयसिंह जाधव, आमदार मनोज कायंदे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर उपविभागीय अधिकारी प्राध्यापक खडसे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम तहसीलदार वैशाली डोंगरजाळ नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी आदीसह कार्यकारणी सदस्य राजेश भुतडा डॉक्टर शंकर तलवे,राजेश इंगळे संतोष खांडेभराड पवन जोरे प्रदीप वाहक मधुकर रायमुल बळीराम मापारी सतीश बारवकर नंदन खेडेकर गोपाळ व्यास ॲड विजय सुनगत ॲड रामेश्वर रामाने सुनील शेजुळकर सुजित गुंडे प्रभाकर खांडेभराड प्रवीण धन्नावत मल्हार वाजपे ॲड अर्पीत मिनासे राजू खांडेभराड निलेश अग्रवाल आशिष वैद्य अविनाश भावसार ,अनिकेत भाग्यवंत भीमराव चाटे सर्व पत्रकार संघाचे सदस्य आदी सदस्यासह समिती मधील 100 सदस्यांनी श्री गणेश मंडळांचा सत्कार व सन्मान केला .छत्रपती गणेश मंडळ यांनी महात्मा फुले चौकातील मंच सत्कारासाठी उपलब्ध करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज गुप्ता यांनी केले तर आभार अध्यक्ष ब्रिजमोहन मलावत यांनी मानले

     नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळे यांच्या मार्गदर्शनामध्ये श्री मूर्तीचे विसर्जन आमना नदीतील काठावरील पालिकेच्या विहिरीत करण्यात आले संपूर्ण विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता, नगरपरिषद चे अधिकारी व कर्मचारी विसर्जनासाठी आमना नदीच्या काठावर उपस्थित होते

    समस्त गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या स्वरामध्ये गणरायाला निरोप दिला

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये