ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ताडोबासह राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पाच्या बुकींगसाठी आता एकच संकेतस्थळ

२३ सप्टेंबर पासून पर्यटकांच्या सेवेत दाखल

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्पात सफारीचे पर्यटन नोंदणीसाठी नवे अधिकृत संकेतस्थळ www.mytadoba.mahaforest.gov.in येत्या २३ सप्टेंबर पासून पर्यटकांसाठी सुरू होत आहे अशी माहिती मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

ताडोबा कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह मेळघाट, नवेगांव-नागझीरा,पेंच, सह्यांद्री या प्रमुख व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील इतरही अभयारण्याची ऑनलाईन बुकींग या संकेतस्थळावरून करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ताडोबा पर्यटनाच्या ऑनलाईन नोंदणीमध्ये चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या कंपनीने ताडोबा फाऊंडेशनची १२ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्यानंतर बुकींगसाठी ही नविन अधिकृत संकेतस्थळ तयार केले गेले आहे. ताडोबा व्यवस्थापनाने यापूर्वीचे www.mytadoba.org व https://booking.mytadoba.org हे संकेतस्थळ तत्काळ बंद केले. त्यामुळे आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी एकमेव अधिकृत संकेतस्थळ www.mytadoba.mahaforest.gov.in शनिवार २३ सप्टेंबर पासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. या संकेतस्थळावरच बुकींग करावे असे आवाहन डॉ.रामगावकर यांनी केले आहे. या संकेतस्थळाची चाचणी यशस्वी झाली आहे.

तेव्हा राज्यातील व्याघ्रप्रेमी पर्यटकांनी या संकेतस्थळाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. सदर बुकिंग प्रणाली ही महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांनी National Informatics Centre यांच्या माध्यमातून विकसित केली आहे. सदर प्रणाली SBI e Payment-gateway सोबत जोडण्यात आलेली आहे. तसेच कोअर क्षेत्रात पर्यटनासाठी उपलब्ध कँटर वाहनाची बुकिंग वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल, मुल रोड, चंद्रपूर यांचे कार्यालयात २५ सप्टेंबर २०२३ पासून सकाळी ११ ते २ व दुपारी ३ ते ५ या वेळेस सुरु राहील. सफारी बुकिंग, वेबसाईट संदर्भात कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांक 9579160778 यावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यत संपर्क करावा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये