ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांची कारवाई

तालुक्यातील मांगली गावाजवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांनी एका अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई दिनांक 6रोज मंगळवार रात्रला11 वाजता भद्रावती पोलिसांतर्फे करण्यात आली.

या कारवाईत 5,000 रुपये किमतीची रेती व तस्करीसाठी वापरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत दोन लाख पाच हजार रुपये असा दोन लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वाळू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर नाकेबंदी करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एम.एच. 34ap 1205 या ट्रॅक्टर वर कारवाई करीत ट्रॅक्टर मालक घनश्याम शेषराव उताणे राहणार मांगली व ड्रायव्हर विकासभीमराव कोटनाकेच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाई ठाणेदार लता वाडिवे यांच्या मार्गदर्शनात गजानन तुपकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, रोहित चीटगिरे, योगेश घाटोळे यांनी केली. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये