ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जगन्नाथ बाबा विद्यालय वायगांव येथील शिक्षक मंगेश बोढाले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराणे सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     शिक्षक दिनानिमित्त विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूर यांनी आयोजित कार्यक्रमात श्री जगन्नाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वायगांव येथील शिक्षक मंगेश देविदास बोढाले यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.

बोढाले सरांनी शालेय शिक्षणाबरोबरच विविध उपक्रमांतून सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय लागावी यासाठी शालेय विद्यार्थी बचत बँक सुरू केली. शालेय आरोग्य शिबिरांतर्गत रक्तदान शिबिरांचे आयोजन करून स्वतःही रक्तदान केले. तसेच वृक्षारोपण व संवर्धन उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

माजी विद्यार्थी मेळावा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल जिव्हाळा निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांनी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धा आयोजित केल्या.

त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये