ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांवगी पोलीसांची दमदार कामगीरी मंदिरात झालेली चोरी १२ तासांत उघड

२ आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे हनुमान गंदीर सालोड हिरापुर येथील अध्यक्ष फिर्यादी कुणाल विष्णुकुमार वांदीले वय 31 वर्ष रा. सालोड हिरापुर यांनी पो.स्टे ला रिपोर्ट दिला की दि. 04.09.2025 ला रात्री मंदीराला लॉक वगेरे लावून पुजारी घरी गेले व दुसऱ्या दिवशी दि. 05.09.2025 चे सकाळी 06:00 वा मंदीराचे पुजारी सुरेश वाळके यांनी मंदीरात येवून पाहीले असता त्यांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीराच्या गेटचे लॉक तोडून मंदीराचे आतमध्ये प्रवेश करून मंदीरात असलेल्या दानपेटीचे लॉक फोडून दानपेटीमध्ये असलेले अंदाजे 400 ते 500/रू. नगदी चोरून नेले आहे. अशा फिर्यादीने दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरुन अज्ञात आरोपी विरूध्द पो.स्टे. ला अप.क. 728/2025 कलम 331 (3), 331 (4), 305(अ), 3(5) बी. एन.एस. प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा. ठाणेदार श्री पंकज वाघोडे, साहेब पो. स्टे सावंगी यांचे प्रत्यक्ष मार्गदर्षनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील गुन्हे शोध पथक हे अज्ञात आरोपींचे व चोरीस गेलेल्या मालाचे शोधात असताना मुखबीरकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे 1) गजानन शंकरराव कोडापे वय 32 वर्ष, 2) आकाश रवि राउत वय 25 वर्ष, दोन्ही रा. गिट्टीखदान बोरगाव मेघे, ता.जि. वर्धा. यांना ताब्यात घेवून त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याबाबत पंचासमक्ष कबूली दिली असून त्यांचेकडून मंदीराचे दानपेटीतील चोरून नेलेले 430/ रू. नगदी आरोपी कडून गुन्हयात जप्त करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व गुन्हे शोध पथकाचे पो.हवा संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये