विद्युत करंट लागून शेतात मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील रायपूर येथील घटना तालुक्यात सायंकाळी मुसळधार पावसाने शेतात जाणारा विद्युत तार तुटला तो तार शेताच्या कुंपणाच्या काटेरी तारावर पडल्याने दुर्घटना झाली. मयत तुकाराम रामचंद्र आत्राम वय 55 रा.रायपूर हा शेतकरी आपल्या गावाजवलं असलेल्या सकाळी दिनांक 2 सकाळी सात च्या सुमारास गेला.
मात्र, रात्री विद्युत तार तुटून काटेरी तार कुंपणाला करंट होता त्याचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तसेच गीता अनिल आत्राम वय 37 या महिलेला करंट लागला असताना बांबूच्या विद्युत तार अलग करून तिचे प्राण वाचविले तिच्या तळहाताला दुःखापत झाली असून ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे उपचार सुरु आहे तसेच प्रकाश रामचंद्र आत्राम वय 45 अशोक आत्राम वय 47 रा.रायपूर यांना किरकोळ दुःखापत झाली घटनेची माहिती पोलीस स्टेशन कोरपना येथे देण्यात आली पोलीस पथकाने घटना स्थळ गाठून पंचनामा केला तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

मृतदेह उत्तर तपासनीसाठी ग्रामीण रुग्णालंय येथे आणले.शवविच्छेदन करून शव नातेवाईकांना ताब्यात दिले. या घटनेमुळे रायपूर गावात शोककळा पसरली असून कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी ग्रामस्था कडून करण्यात येत आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार गाडे साहेब याच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक केकण,उपनिरीक्षक नैताम साहेब पोहा राठोड, आडे, नामदेव पवार,कोरपना पोलीस करोत आहे.