ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिवतीत अभिवादन

विविध कार्यक्रमांनी विचारांना उजाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जिवती येथे सकल मातंग समाज व डॉ. अण्णाभाऊ साठे फाउंडेशन स्मारक समितीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष प्रा. सुग्रीव गोतावळे, सचिव दत्ता तोगरे, राज्य समन्वयक डॉ. अंकुश गोतावळे, अंबादास कंचकटले, रमाकांत जंगापल्ले, भानुदास जाधव, विजय गोतावळे, चरणदास केदासे, नागनाथ महाराज तोगरे, सौ. अनिता गोतावळे, पद्माकर पोतवळे, गजानन वाघमारे, जांभळे सावकार, बाळू मस्के, देविदास कांबळे, शिवाजी गुंटे, विजयकुमार कांबळे, गोविंद गायकांबळे, वाघमारे मामा, रंगराव जाधव, इसांबर इंद्राळे यांच्यासह विजय अकॅडमीचे संचालक नलवाड, चलवाड तसेच त्यांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच निमित्ताने अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्य आणि सामाजिक योगदानावर आपले विचार प्रभावीपणे मांडले.

दरम्यान, कुंभेझरी येथे ही ग्रामस्थांच्या पुढाकारातून अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. वावरे, पोलीस पाटील संतोष गोतावळे, उपसरपंच अनिल बसवंते, संजय भालेराव, बळी भालेराव, शेखर पट्टेवाले यांच्यासह ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श समाजाने अंगीकारण्याचा संकल्प व्यक्त केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये