ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या निमित्ताने पत्रकार परिषद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 6 मार्च ला सिंदखेडराजा येथे सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पत्रकार बांधवासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.

उपविभागीय अधिकारी यांनी आगामी लोकसभा निवडणूक2024 ची तयारी प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीने सुरु आहे याबाबत माहिती दिली, आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच 85 पेक्षा जास्त वय असणारे आणि 40 टक्के पेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातूनच मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदारांची नोंद झाली असून एकूण 3 लाख 12 हजार 576 एवढे मतदार आहेत, त्यापैकी 80 पेक्षा जास्त वयोगटातील तब्बल 11 हजार 676 मतदार आहेत, तर शारीरिक विकलांग मतदारा ची संख्या 2 हजार 899 आहेत.

या मतदारांना आता घरातूनच मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे,निवडणूक घोषित झाल्यानंतर 5 दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे 12 डी क्रमांकाचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे, जिल्हाधिकारी यावर अंतिम निर्णय घेणार असून प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबंधित मतदारा च्या घरी करणार आहे, दरम्यान मतदान करताना निवडणूकीतील उमेदवाराचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष प्रतिनिधी, प्रत्यक्ष उपस्थित राहतील, मतदाना चे चित्रीकरण केले जाणार आहे, यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीत तयार करण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूम बद्दल,तसेच कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण बदल माहिती दिली,पत्रकार परिषदेत तहसीलदार सचिन जयस्वाल, नायब तहसिलदार सातव,नोडल सहाय्यक प्रकाश शिंदें, कोतवाल राजेंद्र खरात तसेच सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये