टाकाऊ वस्तु पासून बाप्पांच्या सुशोभीकरणासाठी साकारले जेजुरी गडाचे मखर
मखर पाहण्यासाठी भाविकांची होत आहे अलोट गर्दी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राज्यात अल्पावधीत प्रसिद्ध झालेले देऊळगाव राजा येथील श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थांनच्या वतीने गेल्या चार वर्षापासून महर्षी वशिष्ठ वेद विद्यालय व श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय हे एकाच छत्राखाली चालवण्यात येते महाराष्ट्रातील हे एकमेव संस्थान असे आहे की या ठिकाणी दोन्ही विद्यालय एकत्र चालविण्यात येतात.
या दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत बाप्पांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मंत्रांच्या उद्घोषात केली व टाकाऊ वस्तु पासून बाप्पांना साजेशी असे जेजुरी गडाची प्रतिकृती मखर तयार केले व त्याला रासायनिक रंगाचा वापर न करता विघटनशील रंगाचा वापर करून अधिक आकर्षक केले कोणाच्या अंगात कोणती कला घुसलेली असते हे त्याने केलेल्या कलेच्या प्रदर्शनानंतरच लक्षात येते. या संस्थांनमध्ये यापूर्वी वटवृक्षाचे विशाल काय महावृक्षातून श्रींची मूर्ती साकारलेली आहे या वटवृक्षातून साकारलेल्या गणरायाच्या या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी व नव्याने स्थापन केलेल्या बाप्पांची मूर्ती व जेजुरी गडाचे मखराची पाहणी करण्यासाठी भाविकांची या ठिकाणी गर्दी होताना दिसून येत आहे.
या दोन्ही विद्यालयाचे प्रमुख हरिभक्त परायण वेदविभूषण उदबोध मोहननाथ महाराज पैठणकर हे वेळोवेळी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करीत आहेत.