ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण आजपासून नागपूर येथे सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जणांसाठी यांनी मुंबईत 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून आरक्षण सरकारने देऊ नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूर येथील संविधान चौकात दि. 30 ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे याचे प्रमुख उपस्थितीत सुरू केले आहे.

दि. 30 ऑगस्ट रोजी संविधान चौकात सुरू झालेल्या साखळी उपोषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, कार्याध्यक्ष प्रा शेषराव येलेकर,ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, सुरेश कोंगे, कर्मचारी महासंघाचे शाम लेडे, दौलत शास्त्री केशव शास्त्री, अविनाश घागरे, हेमंत गावंडे, एडवोकेट प्रवीण डेहनकर, सुरेश जिचकार, सुधाकर तायवाडे, प्रकाश वरसे, डॉ. मनोहर आंबुलकर, मनोहर तुपकरी, गणेश गाडेकर, गणेश नाखले, भास्कर पांडे ,इत्यादींचा सहभाग आहे.
आज या साखळी उपोषणाला गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान, आमदार सुधाकर आडबले आमदार अभिजीत वंजारी माजी आमदार सुधाकर कोहळे ,आमदार डॉ परीनय फुके, माजी आमदार आशिष देशमुख, अशोक धवड, माजी आमदार सेवक वाघाये,माजी आमदार अविनाश वारजुरकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.उज्वला बोडारे , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दुनेश्वर पेठे, दिनेश चोखारे, महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार सुधाकर देशमुख आदी उपोषण मंडपाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या उपोषणाला तिरळे कुणबी समाज, राष्ट्रीय खैरे कुणबी समाज संघटना तसेच तेली समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रमुख मागन्या
1 मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये तसेच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये
2 अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी
3 ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमात शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी
4 परदेशी शिष्यवृत्तीसाठी 75 विद्यार्थ्यांची संख्या वाढवून 200 विद्यार्थी करण्यात यावी
5. महा ज्योती या संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी 6. माडा व सिडको तर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसींना आरक्षण लागू करण्यात यावे
7. नागपूर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त बांधलेले 200 मुलींचे तयार वस्तीगृह तसेच नागपूर येथे स्वर्गीय वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार असलेले 200 मुलांचे वस्तीगृह ओबीसी, व्ही जे,एनटी,एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावे.
8 ओबीसी विजा, भज व विमाप्र समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची तीन वर्षापासून प्रलंबित असणारी फेलोशि त्वरित अदा करण्यात यावी या मागण्यासह 14 मागण्या महाराष्ट्र शासनाला करण्यात आल्या आहेत.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गुणेश्वर आरीकर, शरद वानखेडे, मनीष फुके, श्रीकांत मसमारे, ऋतिका डफ, शकील पटेल, खुशाल शेंडे, नरेश बुरडे, राहुल करांगळे, नितेश कडव, मुकेश पुडके, ऋषभ राऊत, चंद्रकांत हिंगे, राजू मोहोळ, गणेश नाखले, प्रकाश साबळे, अनिल तायडे, इत्यादींनी परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये