चंदनखेडा येथे बचतगटांचा ३ कोटी ७९ लाख ६० हजार रुपयाचे “महाकर्ज वितरण सोहळा” संपन्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा चंदनखेडा, चोरा, पेऑफीस मुधोली येथील बचतगटांना दि.३० ऑगस्ट २०२५ रोजी ३ कोटी ७९ लाख ६० हजार रुपये कर्ज वितरीत करण्यात आले. बँकेचे वतीने आज सगळ्यात मोठा “महाकर्ज वितरण सोहळा” संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी महिलांना संबोधीत करतांना सांगितले की, बचतगटांना कर्जवाटपात चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही, विदर्भात प्रथम कमांकाची बँक आहे. गेल्या वर्षात बँकेनी १४२ कोटी ६० लाख ६० हजार रुपये बचतगटांना कर्जवाटप केले. यावर्षात माहे जुलै २०२५ पर्यंत ९७ कोटी ७८ लाख रुपये कर्जवाटप केले. ते १५० कोटी रुपये पर्यंत नेण्याचा मानस आहे.
इतर जिल्हयात शेतक-यांनी आत्महत्या केल्या, परंतु चंद्रपुर जिल्हयात बचतगटामुळे आत्महत्याचे प्रमाणे नाहीचे बरोबर आहे. कारण बँकेचे महिला बचतगटाचे जाळे विणले आहे, त्यांच्या पाठीमागे बँक आहे. गटाच्या माध्यमातुन महिलांचे हात बळकट करणार आहे. तसेच बँकेकडे २०८३८ बचतगट असुन त्यातुन २५०००० महिला बँकेशी जोडल्या आहेत. बचतगटांना ३ टक्के प्रमाणे नाबार्डने व्याज परतावा दिलेला आहेत. ५ कोटी ८५ लाख रक्कम बचतगट खात्यात वळती केलेली आहे. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मा. हंसराजजी अहिर, अध्यक्ष, केंद्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी खासदार यांनी मेगा बचतगट कर्ज वितरण सोहळयाला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यकमाचे उद्द्घाटक मा.करणजी देवतळे, आमदार, विधानसभा क्षेत्र वरोरा-भद्रावती यांनी सांगीतले की, कृषी उत्पन्न बाजार समिती बरोरा, येथे शेतक-यांसाठी तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे निर्माण करण्याकरीता शासनाची मान्यता मिळालेली आहे, तसेच बचतगट आर्थीक केंद्र असुन बचतगटातुन महिलांनी आपला सर्वांगीत विकास साधावा. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विशेष प्रमुख पाहुण्या मा. श्रीमती प्रतिभाताई सुरेश धानोरकर, खासदार तथा बँकेच्या संचालिका यांनी बँकेचे कौतुक करतांना सांगीतले की, निवनिर्वाचित संचालक मंडळ व मा.रविंद्र श्रीनिवासराव शिंदे हे चांगले काम करीत आहे. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आपली हक्काची बँक आहे. ‘बुल आणि मुल’ येथेच बंदिस्त न राहता महिलांनी नवनविन व्यवसायाचे क्षेत्र बचतगटाच्या माध्यमातुन साध्य केले पाहीजे.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मा.श्री. संजय गुलाबराव डोंगरे, उपाध्यक्ष, चंद्रपुर जि.म.स. बँक यांनी आपल्या मार्गदर्शनात बचतगटांनी विविध व्यवसाय उभारुन आपल्या शेतीला जोडधंद्याची साथ द्यावी व आपले कुटूंब प्रगतीपथावर न्यावे, असे सांगीतले.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बँकेच्या संचालिका मा. नंदाताई वसंतराव अल्लुरवार यांनी महिला विकासाचे बचतगट हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगीतले. बचतगटातुन आपली प्रगती साधण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमाला बँकेचे जेष्ठ संचालक डॉ.प्रा.ललितजी मोटघरे यांनी बचतगट चळवळीचा इतिहास मांडला. कार्यकमाला बँकेचे संचालक तथा अध्यक्ष, विभागीय कर्ज समिती, वरोरा मा.जयंत मोरेश्वर टेंभुर्डे, मा. रोहित चरणदासजी बोम्मावार, संचालक महोदय यांची उपस्थितीत होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.राजेश्वर भिमरावजी कल्याणकर यांनी केले. मा. अशोकजी जिवतोडे व मा. रामेशजी राजुरकर यांनी कार्यक्रमात उत्कृष्ठ मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाला अश्लेताताई जिवतोडे, अतुल जिवतोडे, राजेंद्रजी डोंगे, विनोद घुगूल, शामदेवजी कापटे शांताताई रासेकर, बंडुपाटील नन्नावरे, भारत जिवतोडे, पंडीत कुरेकर, गजानन उताणे, प्रविण बांदुरकर, परमेश्वर ताजणे, राजु आसुटकर, मनोहर आगलावे, भानुदास गायकवाड, मारोती गायकवाड, राजु काळमेघे, गुडडू चौधरी, अनिल चौधरी, ज्ञानेश्वर डुकरे, शरद जांभुळकर, कान्होबा तिखट, मोहन भुक्या, नयन जांभुळे, शंकर गायकवाड, कृष्णाजी नन्नावरे, दयाराम जांभुळे इ. उपस्थिती होती.