पीस फाउंडेशनची बैठक आमेना अजिज एज्युकेशनल कॅम्पस येथे संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आमेना अजिज एज्युकेशनल कॅम्पस, देऊळगाव राजा येथे 29 ऑगस्ट रोजी पीस फाउंडेशन ची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत संस्थेचे ध्येय, उद्दिष्टे व कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीस पीस फाउंडेशन जालना जिल्हाध्यक्ष मिर्झा अफसर बेग तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष हाजी आलम खान कोटकर उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी समाजातील एकोपा, शांतता, शिक्षणाचे महत्त्व आणि युवकांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करून सभासदांना प्रेरणा दिली.
यावेळी सभासद नोंदणी शिबिर घेण्यात आले असून अनेक नवीन सदस्यांनी फाउंडेशनमध्ये सहभागी होऊन सामाजिक कार्यासाठी आपला हातभार लावण्याची तयारी दर्शवली.
हाजी अज़ीमोद्दीन सर, आर.डी नरोडे सर, खांडेभराड सर, सय्यद करीम , हाजी अल्ताफ खान, इस्माईल बागवान, शेख कदीर जहीर पठाण,दिनकर जाधव मापारी मामा रफिक पठाण अब्दुल कदीर नाकेदार, अहेमद खान, मुस्तफा भंडारी इत्यादी उपस्थित राहून यांनी सभासद फॉर्म नोंदविले.
या कार्यक्रमात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पीस फाउंडेशनच्या पुढील कार्ययोजनांवर चर्चा करून बैठकीचा समारोप करण्यात आला.