ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय

मेगा बचत गट कर्ज वितरण सोहळा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर हि जिल्हातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रगतीशील बँक असून, विदर्भातील क्रमांक एक व महाराष्टातील टाप श्री सहकारी बँकामध्ये गणली जाते. पारदर्शक कामकाज, प्रामाणिक नेतृत्व आणि सहकार क्षेत्रातील नवे उपक्रम यामुळे बँकेवर सर्वसामान्य शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण जनतेचा प्रचंड विश्वास आहे.

बँकेच्या चंदनखेडा, चोरा, पे.ऑ. मुधोली शाखांच्या अंतर्गत मेगा बचत गट कर्ज वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार ३० ऑगस्ट २०२५. रोजी सकाळी ११.३० वाजता, कर्मवीर सभागृह चंदनखेडा, ता. भद्रावती येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यात जिल्हाभरातील मोठ्या संख्येने बचत गटांना कर्जवाटप करण्यात येणार असून, हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनाचा आणि ग्रामीण विकासाचा नवा टप्पा ठरणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक हे भूपवणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री. हंसराजजी जहीर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मा. खासदार तथा बँकेच्या संचालिका सौ. प्रतिभाताई धानोरकर व आमदार थी. करणजी देवतळे हे विपेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात चंद्रपूर जिल्हातील प्रसिद्ध उद्योजक श्री. रमेशजी राजूरकर विपेश मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

मा.श्री.संजयजी डोंगरे उपाध्यक्ष-चं.जि.म.स. बैंक. मर्या., चंद्रपूर, मा.श्री. जयंतजी टेमुर्डे, अध्यक्ष विभागीय कर्ज समिती वरोरा विभाग, हे विषेश निमंत्रीत पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यांच्या समवेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक चे संचालक सर्व मा.श्री. आवेशखानजी पठाण, गणेशजी तर्वेकर प्रा. ललितजी मोटघरे, गजाननजी पाथोडे, रोहितजी बोम्मावार, बँकेच्या संचालिका मा.सौ. नंदाताई अल्लूरवार तसेच मा.श्री. राजेश्वरजी कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चं.जि.म.स.बैंक. हे विषेश निमंत्रीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. सौ. अवेशाताई जीवतोडे, मा.सर्व श्री. गजाननजी उताणे, अनिलजी चौधरी, अतुलजी जीवतोडे, प्रवीणजी बांदूरकर, ज्ञानेश्वरजी डुकरे, राजेंद्रजी होंगे परमेश्वरजी ताजणे, शरदजी जांबूळकर, विनोदजी घुगुल, राजुजी आसुटकर कान्होबाजी तिखट, शामदेवजी कापटे, मनोहरजी आगलावे, मोहनजी भुक्या, शांताताई रासेकर, भानुदासजी गायकवाड, नयनजी जांबूळे बंडूपाटील नन्नावरे, मारोतीजी गायकवाड, शंकरजी गायकवाड, भारतजी जीवतोडे, राजुजी काळमेंगे, कृष्णाजी ननावरे, पंडितजी कुरेकार, गुड्डू चौधरी, दयाराम जांबुळे आदी उपस्थित राहणार आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बचतगटांना कर्ज पुरवण्याचा उपक्रम सातत्याने राबवला आहे. या कर्जामुळे माहिलाना लघुउद्योग सुरु करण्याम, शेतीपूरक व्यवसाय, डेअरी पशुपालन, किरकोळ दुकाने आदी क्षेत्रात रोजगारनिर्मिती करण्यान मोठी मदत झाली आहे. बचतीची सवय, वेळेवर कर्जफेडीची शिस्त आणि सामाजिक एकोपा यामुळे बचत गट आज ग्रामीण भागातील विकासाचे खरे केंद्रबिंदू ठरले आहेत.

या सर्व यशामागे बँकेचे अध्यक्ष मा.रवींद्र श्रीनिवामराव शिंदे यांचे कुशल नेतुत्व आणि पारदर्शक कामकाज आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने गेल्या काही वर्षात वेगवान प्रगती साधली असून, राज्यातील सहकार क्षेत्रात आपले ठळक स्थान निर्माण केले आहे. संचालक मंडळाचे मार्गदर्शन कर्मचाऱ्यांचे निष्ठावान कार्य आणि ग्राहकांचा विश्वास हीच बँकेच्या यशामागची खरी ताकद आहे.

३० ऑगस्ट रोजी होणारा मेगा बचत गट कर्ज वितरण सोहळा हा केवळ कर्जवाटपाचा कार्यक्रम नसून, तो ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि सक्षम सहकाराच्या दिशेने टाकलेले मोलाचे पाऊल ठरणार आहे.

विशेष म्हणजे २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्याने या वर्षात सहकाराच्या विविध उपक्रमांचे आयोजन बँकेमार्फत मातत्याने केले जात असून, मेगा बचत गट कर्ज वितरण सोहळा हा त्या उपक्रमांचा एक महत्वाचा भाग ठरत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये