ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत गावाची तपासणी

चांदा ब्लास्ट

दिनांक 9/7/2023 स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंर्तगत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींची तपासनी राज्यस्तरीय तपासणी पथका कडुन नुकतीच करण्यात आली आहे. राज्यस्तरीय पथका मध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील गावांची तपासणी करीता वाशिम जिल्हा परिषदच्या स्वच्छ भारत मिशनचे माहीती शिक्षण संवाद तज्ञ राम शुंगारे, क्षमता बांधणी तज्ञ प्रफ़ुल काळे, व सनियत्रंन व मुल्यांकन तज्ञ विजय नागे यांचा समावेश होता.

            राज्यस्तरीय तपासणी चमुकडुन वरोरा तालुक्यातील आंनदवन, मुल तालुक्यातील भादुर्णी,कोसंबी, राजगड, नागभिड तालुक्यातील कोटगाव,ब्रम्हपुरी तालुक्यतील जुगनाळा, जेवराबोडी मेंढा, पोभुर्णा तालुक्यातील आष्टा, घाटकुळ, गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर अशा दहा गावांना भेटी देवुन स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या अनुषंगाने गावांची तपासणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कुटुंबांचे सर्वेक्षण करुन शौचालयाची तपासणी करण्यात आली. कुटुंबस्तरावरीय कचरा व्यवस्थापन  व वर्गीकरण माहीती संकलित करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी कचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामाची तपासणी करण्यात आली. शाळा,अंगणवाडी व ग्रामपंचायत घर मधिल शौचालय व पांण्याची सुविधाची तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रामधिल   शौचालय व पांण्याची सुविधाची तपासणी करण्यात आली. तपासणी चमुकडुन जिल्ह्यातील निवडक गावाच्या तपासणी अंती लवकरच राज्याला अहवाल सादर करणार असुन, यातुन केंद्रीय स्तरावर निवडक गावाची शिफ़ारस राज्यस्तरावरुन करण्यात येणार आहे. या वेळी राज्यस्तरीय तपासणी चमुसह चंद्रपुर जिल्हा परिषदच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे सनियत्रंन व मुल्यांकन तज्ञ साजिद निजामी, माहीती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे,समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, एच आर डी बंडु हिरवे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये