राष्ट्रसंत साहित्य परिषदेच्या वतीने मारोती गांवडे आणि मोरेश्वर इंगोले यांना श्रद्धांजली अर्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने विसापूर येथील ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक मारोतराव गावंडे आणि टाकळी (चना) येथील ज्येष्ठ गुरुदेव सेवक मोरेश्वर इंगोले यांना आँनलाईन पध्दतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रास्ताविक डॉ. धर्मा गावंडे यांनी करून दिवंगत मारोतराव गावंडे यांच्या कार्य जीवनावर प्रकाश टाकला तर दिवंगत मोरेश्वर इंगोले यांच्या जीवनकार्य संबंधाने श्रीकांत धोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . परिषदेचे कार्यकारी सदस्य विलास उगे, विनायक साळवे, अमित इंगोले, कैलास उराडे, देवराव कोंडेकर, पंडीत लोंढे, पांडुरंग गांवडे, चेतन चिडे, मोहन मसाडे, मनस्वी गावंडे, डॉ . भाग्यश्री गावंडे, रवी गावंडे, विठ्ठल गावंडे, भारती बरडे, प्रभाकर आवारी
आदींनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात.
दिवं. मारोतराव गावंडे हे खडतर जीवन जगले. शिक्षणाचे महत्त्व ओळखून अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार ते जगले तसेच मारोतराव इंगोले हे सच्चे कृषीनिष्ठ, स्वच्छता अभियान राबविणारे व्यक्तिमत्व होते.
या दोन्ही व्यक्तीमत्वाच्या कार्य दिशा प्रेरक असल्याचे मत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन एड. राजेंद्र जेनेकर राजुरा यांनी केले तर तंत्र नियोजन डॉ. श्रावण बानासुरे यांनी केले.