विजय मार्कंडेवार स्मृती पर्यावरण मित्र पुरस्कारासाठी प्रा.विलास पारखी आणि मारोती पिदूरकर यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने यावर्षीपासून ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विजय मार्कंडेवार स्मृती पर्यावरण मित्र पुरस्कार सुरू करण्यात आला असून यावेळी या पुरस्कारासाठी गडचिरोली येथील सर्पमित्र, वृक्ष मित्र प्रा. विलासराव पारखी व उर्जानगर येथील वृक्ष मित्र मारोती पिदूरकर या दोघांची निवड करण्यात आली आहे.
या संदर्भात नुकतीच एक समितीची सभा घेण्यात आली आणि या पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावातून निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले पर्यावरण तज्ज्ञ म्हणून विजय मार्कंडेवार यांचे नाव सुप्रसिद्ध आहे.त्यांनी १९८४ साली सुरूवातीला सुरू केलेले ब्लुमिंग बड्स ट्रस्ट, त्यांनी विविध शाळांमध्ये घेतलेले १५० पर्यावरण जनजागृतीपर स्लाईड शो, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चळवळीत अविरत दिलेले योगदान मोठे आहे.
निवड झालेल्या व्यक्तींचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, एड. राजेंद्र जेनेकर, डॉ. श्रावण बानासुरे, देवराव कोंडेकर, विलासराव उगे, श्रीकांत धोटे, उदय धकाते , पत्रकार उदय धकाते, प्रकाश चांभारे, डॉ. धर्मा गावंडे, प्रा. नामदेव मोरे, अभय घटे, एन. एन. गेडकर, संजिव पोडे आदींनी केले आहे.