रोटरी द्वारा आयोजित आंतर शालेय गायन स्पर्धेत महर्षी वशिष्ठ वेद विद्यालयाने मारली बाजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरात श्री संत नरहरी नाथ महाराज संस्थान द्वारे एकाच छताखाली गेल्या चार वर्षापासून महर्षी वशिष्ठ वेद विद्यालय व श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय चालविण्यात येत आहे या दोन्ही विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बाहेर गावातील रहिवासी आहेत या ठिकाणी आवास,निवास व भोजनाची पूर्णपणे निशुल व्यवस्था करण्यात आलेली आहे जालना शहरात दिनांक 23 ऑगस्ट रोजी रोटरी व रोट्रॅक्ट क्लब द्वारा आयोजित (स्वरम 3:0)इंटर स्कूल गायन स्पर्धेत या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व त्या ठिकाणी संस्कृत भाषेत राष्ट्र प्रतिज्ञा व दोन संस्कृत काव्याचे यशस्वीपणे सादरीकरण केले आयोजकांनी नेमणूक केलेल्या जुरीच्या टीमने या विद्यालयातील विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांक जाहीर केला सदर स्पर्धेचे आयोजनासाठी एस.आर.जे. स्टील कंपनी जालना यांनी भरीव मदत केली महाराष्ट्रातील प्रत्येक संस्कृतीचे जतन झाले पाहिजे संस्कृत भाषेचे प्रत्येकाने आकलण करण्याची गरज आहे.
यासाठी श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थानचे हरिभक्त परायण वेदविभूषण श्री उदबोध महाराज पैठणकर हे अविरत परिश्रम घेत आहे जालना येथे आयोजित स्पर्धेत सत्तावीस विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला देऊळगाव राजा येथील या विद्यालयाचे विद्यार्थी रुद्र महाले व ओम प्रकाश श्रीखंडे छत्रपती संभाजी नगर, श्रीधर बागडी आजरा कोल्हापूर, मधुर देशपांडे देऊळगाव राजा, विघ्नेश दीक्षित मुंबई, ओम येंडे अमरावती यांनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या या कलेचे स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थितानी कौतुक करून टाळ्यांच्या गडगडाटात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वाद्य विरहित राष्ट्रप्रतिज्ञा चे स्वागत केले.
स्वरम 3.04 आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ जालन्याचे प्रोजेक्ट चेअरमन प्रशांत महाजन व सुनीती मदान यश बगडीया रोट्रॅक्ट क्लब ऑफ जालन्याचे सुमित जैन अजय जाधव जितेंद्र कारिया सह रोटरीचे अध्यक्ष वर्षा पिती व सेक्रेटरी लक्ष्मीनिवास मल्लावत, रोटरॅक्ट क्लब चे अध्यक्ष चिराग तलरेजा व सचिव शैलेश जैन. रोटरॅक्ट चे उपाध्यक्ष भरत अग्रवाल जॉईन सेक्रेटरी अभिजीत मालपाणी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शुभम पाटील यांनी केले.
स्वरम 3.0 मध्ये स्पर्धकांना दोन प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध होते एका व्यासपीठावर वाद्यासह गायन सादरीकरण करणे तर दुसऱ्या व्यासपीठावर केवळ मौखिक गायन सादर करणे यामध्ये वाद्यासह गायन स्पर्धेत प्रथम ऋषी विद्या विद्यालय जालना, द्वितीय एमआरडीए विद्यालय जालना, तृतीय पायोनियर इंटरनॅशनल सीबीएससी शाळा जालना, वाद्याविना. गायन स्पर्धेत प्रथम सी.टी.एम.के. गुजराती महाविद्यालय जालना, द्वितीय श्री संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था देऊळगाव राजा, तृतीय एम.एस जैन स्कूल व जिल्हा परिषद प्रा . शाळा पिरपिंपळगाव यांना पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले.