चंदनखेडा येथे तान्हा पोळा नंदिबैल सजावट स्पर्धा संपन्न
महात्मा गांधी तंटामुक्त समिती व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट व सासंद आदर्श ग्रामपंचायत शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील ऐतिहासिक सातवाहनकालीन नगरी चंदनखेडा येथे खास तान्हा पोळा सणाचे औचित्य साधून बोलगोपालांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी,पालकांनी केलेल्या विनवनिला प्रोत्साहन देत दरवर्षी प्रमाणे यंदाही महात्मा गांधी तंटामुक्त समिती व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट सांसद आदर्श ग्रामपंचायत शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित तान्हा पोळा नंदिबैल सजावट स्पर्धा दिनांक 23 आगस्ट 2025 ला चंदनखेडा येथील बसस्थानक परिसरात मोठ्या उत्साहाने पार पडली प्रथम पारितोषिक जुनेद शेख ,दुतिय पारितोषिक ओजेश मुडेवार तृतीय पारितोषिक रोहीत सोनवणे यांना प्राप्त झाले.महात्मा गांधी तंटामुक्त समिती कडुन विजेत्यांना विविध भेटवस्तू सन्मान चिन्ह देवुन गुणगौरव गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिरखान पठाण,गावचे सरपंच नयन जांभुळे, ग्रामपंचायत सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी,चरुर च्या पोलिस पाटील दुगाताई केदार,यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.सहभागी संपुर्ण नंदी बैल सजावट स्पर्धकांना बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट सांसद आदर्श ग्रामपंचायत शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा व माजी जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड, अँड सुधीर भालेराव, संतोष खडतकर, प्रकाश सोनुले, संतोष हनवते, अयुब शेख, माजी उपसरपंच विठ्ठलजी हनवते यांचा कडुन शैक्षणिक साहित्यासह प्रोत्साहन पर साहित्य खावु वाटप करण्यात आले.
यावेळी शौर्य क्रिडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते, शुभम भोस्कर, शंकर दडमल,दिलिप ठावरी,रोशन क्षिरसागर, राकेश क्षीरसागर,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे अध्यक्ष मंगेश नन्नावरे, गणेश हनवते, पुरुषोत्तम चौखे, पंकज दडमल, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी अमर बागेसर, रविंद्र मेश्राम, लोकेश कोकुडे, सिंगलदिप पेंदाम, गजेंद्र रणदिवे, मंगेश हनवते, सुनील कोकुडे, सुशिला हनवते, छाया घुगरे, प्रज्वल बोढे,जीत कोकुडे, प्रशांत कोहळे, प्रकाश भरडे,यांनी मोलाचे सहकार्य केले.गावातील युवा वर्ग, महिला भगिनीं पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शुभम भोस्कर, प्रास्ताविक मनोहर हनवते यांनी केले तर आभार आशिष हनवते यांनी मानले.