महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध! – आमदार देवराव भोंगळे
नांदा (फाटा) येथे भाजपा महिला मोर्चाचा 'देवाभाऊ - रक्षाबंधन सोहळा' संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तालुक्यातील मौजा नांदा फाटा येथे काल (दि. २०) भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित केलेला ‘देवाभाऊ – रक्षाबंधन सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या देखण्या सोहळ्याला लक्षणीय संख्येने उपस्थित महिला भगिनींनी आमदार देवराव भोंगळे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही याठिकाणाहून राख्या पाठविण्यात येणार आहेत.
यावेळी बोलतांना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, “रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून, तो महिलांच्या संरक्षणाचा आणि सन्मानाचा प्रतीक आहे.” ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपल्या केंद्र व राज्य सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी योजना, लखपती दिदी, महिला बचत गटांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना, तसेच महिलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी दिली जाणारी आर्थिक मदत याविषयी त्यांनी लाडक्या बहिणींना माहिती दिली. सर्व महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्यामुळे महिलांमध्ये सरकारी योजनांबाबत जागरूकता वाढली आणि त्यांना आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमाला अर्चना भोंगळे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष संजय नित, अमोल आसेकर, आशिष ताजने, शशिकांत आडकिने, अरूण रागीट, अशोक झाडे, विशाल अहिरकर, अबरार अली, बापूजी पिंपळकर, सचिन आस्वले, उपसरपंच पुरूषोत्तम आस्वले, महिला मोर्चाचे अध्यक्ष नम्रता डुकरे, संगीता मुसळे, कैलाश ताकसांडे, हिंमत रायपल्ले, रवी बंडीवार, सतीश जमदाडे, पुरुषोत्तम धाबेकर, कैलाश डाखरे, रामदास जोगी, रामदास पानघाटे, प्रभाकर चटकी, हरीभाऊ बोरकुटे, मारोती जेनेकर, प्रभाकर निवलकर, जतिन राठोड, रंजिता धाबेकर, आरती जमदाडे, निशा नवले, जयश्री ताकसांडे, शालिनी तुराणकर, सुजाता चौधरी, वंदना बडोले, मंगला लोणारे, रेणुका नित, रेखा राठोड, मनिषा उरकुडे, अपर्णा क्षीरसागर, सूरज भिमेकर, अशोक क्षीरसागर, अमोल गोरे, बंडू वरारकर, सतीश करमणकर, शत्रुघ्न शेडमाके, अश्विनी डाखरे, सूरज भिमेकर, गंगाधर जमदाडे, प्रदीप काळे, विठ्ठल हिरादेवे, सचिन भोयर आदिंसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.